राहुरी : राहुरी तालुक्यात परतीच्या पावसाने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने कापसाच्या वाती अन् सोयाबीनची माती झाली आहे.
दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी कापसाच्या झालेल्या वाती हातात घेऊन थेट तहसील कार्यालय गाठले व लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळून देण्याचे आवाहन केले.अन्यथा आचारसंहिता न पाहता तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारले जाईल. यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.
राहुरी तालुक्यामधे गेल्या आठ दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस होत आहे. मुसळधार झालेल्या या पावसाने विषेशतः काढणीला आलेल्या कापसाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर सोयाबीन, मुग, कांदा रोपे, चारा पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन सनासुदिच्या तोंडावर शेतक-यांसमोर आस्माणी संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या ठिकाणी नुकसानग्रस्त भागाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांचा समावेश पाहणी केली आहे.तात्काळ शासनाने या ठिकाणी पंचनामाचे आदेश करून आर्थिक मदत जाहीर करावी. अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला आहे. यावेळी सतिश पवार, प्रमोद पवार, आप्पासाहेब देठे, किशोर जाधव, भैय्या जगताप, आप्पासाहेब जाधव, सिताराम जाधव, सुधाकर जगताप, नानासाहेब जाधव, चंद्रकांत जाधव, कैलास जाधव, एकनाथ पवार, लक्ष्मण जगताप, गणेश डोंगरे, आप्पासाहेब पवार,बाळासाहेब कोळपे,रामकृष्ण जगताप, संदीप जगताप, बजरंग पवार, रावसाहेब तुवरआदिंसह शेतकरी उपस्थित होते.
कापसाच्या वाती घेऊन गाठले शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय
सततच्या पडणाऱ्या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास वरून राजाने हिरावून घेतला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करावे. यासाठी शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी कापसाच्या वाती हातात घेऊन तहसील कार्यालयात धाव घेतली.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा आचारसंहिता न पाहता तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारू.
रवींद्र मोरे,जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
राहुरी तालुक्याधील आंबी,केसापूर व दवनगाव आदी भागात ओढ्याच्या पाण्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.ओढ्याचे पाणी शेतात गेल्याने अंदाजे कापूस पिकाचे क्षेत्र 225 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाली असून यामध्ये 278 शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवालानुसार निदर्शनास येते.लवकरच पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत मिळून दिली जाईल.
नामदेव पाटील, तहसीलदार राहुरी.
सध्या वेचणीला आलेल्या कापूस पिकाचे कालच्या पावसामुळे नुकसान झालेले आहे.ज्या शेतकऱ्यांच्या मागील आठवड्यात विमा कंपनीकडे पीक नुकसान तक्रार द्यावयाची बाकी राहिले आहे.त्या शेतकऱ्यांनी येत्या दोन दिवसात 14447 या टोल फ्री क्रमांक वर पिकाच्या नुकसानीची तक्रार द्यावी
बापूसाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी, राहुरी