Home अहमदनगर तिकीट कापल्याने नाराज अन् भावूक

तिकीट कापल्याने नाराज अन् भावूक

17
0

 

टीम गणराज्य न्यूज नेटवर्क पालघर : पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा गत बारा तासांपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे. काल (सोमवारी) संध्याकाळी घरातून अचानक निघून गेलेले वनगा अजूनही घरी परतले नाहीत. तब्बल 15 तासांपासून श्रीनिवास वनगा घरात नाहीत. त्यामुळे कुटुंबीय मोठ्या चिंतेत सापडले आहेत. वनगा यांचे दोन्ही फोन बंद असल्यानं कुटुंबीयांसह पोलीस प्रशासनाकडून वनगांचा शोध सुरू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पालघरमधून माजी खासदार राजेंद्र गावितांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदेंसोबत गेलेले श्रीनिवास वनगा यामुळे नाराज झाले आहेत. तिकीट नाकारल्यानं माध्यमांशी बोलताना श्रीनिवास वनगा यांचा अश्रूंचा बांध फुटला. कॅमेऱ्यासमोरच ते ढसाढसा रडू लागले. शिंदेंनी फसवणूक केल्याचा आरोप करताना भावूक झालेल्या वनगांनी उद्धव ठाकरेंवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. उद्धव ठाकरे आमच्यासाठी देव होते, अशी भावना वनगा यांनी व्यक्त केली आहे.

शिंदेसमर्थक आमदार श्रीनिवास वनगा यांना पुन्हा उद्धव ठाकरेंची आठवण झाली. खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर, उद्धव ठाकरे यांनीच श्रीनिवास वनगा यांना आमदारकी दिली होती. पण दोन वर्षांपूर्वी झालेल्या बंडात आमदार वनगा यांनी शिंदेंना साथ दिली होती. पण त्याच शिंदेंनी आपल्या समर्थक आमदारांपैकी केवळ वनगा यांचंच तिकीट कापलं आहे. त्यामुळं श्रीनिवास वनगा मानसिक तणावाखाली असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच, याच तणावातून टोकाचं पाऊल उचलण्याचे विचारही त्यांच्या मनात येऊ लागल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अशातच आता ते नॉट रिचेबल असल्यामुळे सर्वजण चिंतेत सापडले आहेत. त्यात वनगा यांचे दोन्ही फोन बंद आहेत. कुटुंबीयांसह पोलीस प्रशासनाकडून वनगांचा शोध सुरू आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here