राहुरी : प्राजक्त तनपुरे यांना आमदार करण्याची जबाबदारी राहुरीकरांनी घ्यावी. मागील पंचवार्षिक च्या काळामध्ये त्यांनी राज्यामध्ये भरू काम केले आहे. त्यामुळे त्याच्या कामाच्या जोरावर त्यांना कॅबिनेट मध्ये स्थान देण्याची जबाबदारी माझी राहील असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी केले आहे.
पवार हे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ वांबोरी येथे बुधवार (13) रोजी आयोजित केलेल्या सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी किसनराव जवरे हे होते.एकनाथ ढवळे, दत्तात्रय कौडगे, बाळासाहेब जठार,अभिषेक भगत,राहुलभैय्या बैराट,रघुनाथ झिने सर, गोविंद मोकाटे आदींची यावेळी भाषणे झाली.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, राज्यामध्ये मागील काही काळात भारतीय जनता पार्टीचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांनी दोन पक्ष फोडून सत्ता मिळविण्याचे काम केले.परंतु भाजपचे हे कृत्य जनतेला रुचलेले नाही. याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत दिसून आला आहे. लोकसभा निवडणुकीत पक्ष फोडी करणाऱ्या भाजपला जनतेने नाकारले आहे. तीच जनता विधानसभेतही भाजप व त्यांच्या मित्र पक्षांना कोणत्याही परिस्थितीवर सत्तेवर येऊन देणार नाही. मी राज्यभर दौरे केले असून राज्यात संत्ततार होणारच ही काळया दगडावरची पांढरी रेष असून राहुरी करांनी आमदार तनपुरे यांना भरभरून साथ देण्याची गरज आहे. आमदार तनपुरे मागील महा विकास आघाडी शासन काळात नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय आला. त्यावेळी सर्वात अगोदर मी प्राजक्तांपर्यंतचे नाव घेतले होते. तनपुरे यांनी माझ्या विश्वासाला तडा जाऊ न देता सहा खात्याला लाजवेल असा आपल्या कामाचा ठसा उमटविला. त्यांच्या चांगल्या कार्याची दखल घेत पुढील शासनामध्ये त्यांना चांगली जागा देण्याची जबाबदारी माझी राहील. राहुरी करांनी आता त्यांना आमदार करावे. मी त्यांना राज्यमंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री बनवतो. असे सांगत पवार यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या कामाचे गुणगान केले.
पुढे बोलताना सक्षणास सलगर म्हणाल्या की, पक्ष फोडून 50 खोके घेत गद्दारांनी सरकार स्थापन केले. त्यातील एक गुंड राहुरीतील भाजप पक्षाची उमेदवारी करत आहे.ज्याने स्वतःच्या पुतणीला धमकावले तो काय राहुरी चा विकास करणार. ज्याची पुतणी सुरक्षित नाही त्याला मतदान करून काय फायदा आहे. लाडकी बहीण योजना बहिणींसाठी अमलात आणली नसून मतांसाठी झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी म्हणून अमलात आणली गेली आहे. भाजपने अनेक मतदारसंघांमध्ये गुंडांनाच उमेदवारी दिली आहे. भाजप सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलण्यास तयार नाही. त्यांनी जनतेला फक्त जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. या मातीत फक्त महाराष्ट्र चिच पताका फडकणार गुजरात यांची नाही.
पुढे बोलताना प्राजक्त तनपुरे म्हणाले की मतदारसंघांमध्ये सहा नवीन सबस्टेशन व 400 पेक्षा अधिक ट्रांसफार्मर बसविण्यात आले. महाविकास आघाडी शासन काळात असंख्य शेतकरी हिताच्या योजना राबविला होत्या. परंतु या सरकारने त्या बंद केल्या. मंत्रीपदाच्या काळामध्ये मतदार संघामध्ये विकासाची गंगा कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम केले.समोरील उमेदवाराकडे बोलण्यासारखा कुठलाही मुद्दा नाही. निळवंडे धरणाची पाणी आणण्यासाठी विरोधकांनी तीन निवडणुका घालविल्या. आपण निळवंडे धरण्यासाठी 1250 कोटी रुपये निधी खर्च करून पाणी मतदार संघात आणले. विरोधकांनी समोरासमोर चर्चेस यावे. पुढील पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज दिली जाईल. दहा वर्षे सत्तेत असताना एखादं तरी ठळक असे काम सांगावे. त्यांनी सत्तेचा वापर फक्त दहशत व दमदाटीसाठीच केला.
यावेळी व्यासपीठावर प्रसाद तनपुरे,राजेंद्र फाळके,दादा कळमकर,अरुण तनपुरे, हर्ष तनपुरे अशोक बाबर, बाळासाहेब हराळ,दत्तात्रय अडसूरे,सोमनाथ धूत गोविंद मोकाटे,अमोल जाधव,नितीन बाफना बाबासाहेब भिटे, अभिषेक भगत, रघुनाथ झिने, हृषीकेश मोरे,उषाताई तनपुरे,वैशाली टेके,सोनाली तनपुरे,रावसाहेब(चाचा) तनपुरे,अभिजित ससाणे, विजय तमनर, विजय दौले,सुरेश लांबे,योगिता राजळे आदींसह अन्य मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.