राहुरी – नगर- पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीकडून उभे असलेल्या उमेदवारावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तर महाविकास आघाडीकडून सुसंस्कृत उच्चशिक्षित व निष्कलंक व जनतेच्या प्रश्नाला प्राधान्य देणारे विकासात्मक व्हिजन असणारे आ. प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी दिली आहे . त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारी वाढविण्यासाठी निवडून द्यायची की उच्चशिक्षित विकासात्मक काम करणाऱ्या प्राजक्त तनपुरे यांना मताधिक्य द्यायचे हे मतदारांनी ठरवायचे असून राहुरी विधानसभा मतदारसंघातील उच्चशिक्षित उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांना तुम्ही कॅबिनेट मंत्री म्हणून बघणार आहात त्यामुळे आ. प्राजक्त तनपुरे यांच्या रुपात पहिलाच कॅबिनेट मंत्री मंत्रालयात पाठविणारच असा दावा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख पै रावसाहेब खेवरे यांनी राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे छत्रपती शिवाजी चौकात आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.
बारागाव नांदूर येथील आ. तनपुरे यांच्या प्रचारार्थ सभा, ग्रामपंचायत व सेवा संस्थेच्या पदाधिकार्यांचा आ. तनपुरेंना एकमुखी पाठींबा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला
या प्रचारासभेच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब गाडे होते. पुढे बोलताना खेवरे म्हणाले की, नगर जिल्ह्यात जे आमदार आहे त्यापैकी एक जण तरी निष्ठावंत भाजपचा आहे का? हे पहा. दुसर्या पक्षातील नेते फोडायचे आणि निष्ठेच्या गप्पा मारायचे हे धंदे भाजपचे आहे. कर्डिले हे सुद्धा भाजपचे निष्ठावंत आहे का? हे तपासावे. केवळ गुन्ह्याच्या बचावासाठी सत्तेला चिकटून बसलेल्या कर्डिलेंना २०१९ साली जनतेने जागा दाखवली आहे. हिंदुत्वाच्या नावावर भाजप आता मते मागत आहे. परंतू हिंदुत्व हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे असते. जाती धर्मामध्ये फूट पाडत स्वहित जपायला हिंदुत्व म्हणत नाही. मी पहिल्यापासून शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता म्हणून मी पक्षाशी निष्ठा जपली आहे. मी पण विधानसभेसाठी इच्छूक होतो. परंतू मत विभाजनाचा लाभ घेत पुन्हा गुन्हेगार आमदार आपल्याला परवडणारा नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा धर्म तर आ. तनपुरेंसारख्या सुसंस्कृत, निष्कलंक व सर्वांना सोबत घेत विकासात्मक कामे करणार्याला पाठबळ देण्याचा निर्णय घेतला आहे. मतदार संघातील प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिक आ. तनपुरेंच्या पाठीशी असून गद्दारी करीत पक्ष व चिन्ह चोरणार्यांना व पक्ष फोडण्यासाठी काळे मनसुबे आखणार्यांना जनता जागा दाखविणारच असा दावा पै. खेवरे यांनी केला. याप्रसंगी सेना तालुका प्रमुख सचिन म्हसे, भाऊसाहेब गाडे, डॉ. ज्ञानेश्वर आघाव, नवाज देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपिठावर जालिंदर गाडे, विलास शिरसाठ, खतीब देशमुख, वसंत गाडे, दिलीप कोहकडे, हमीद इनामदार, सुनिल शेलार, हमीद पटेल, कैलास कोहकडे, डॉ. संजय म्हसे, सुभाष गोपाळे, किशोर कोहकडे, श्रीराम गाडे, सेवा संस्थेचे अध्यक्ष विलास गाडे, उपाध्यक्ष राजेंद्र गाडे, सरपंच प्रभाकर गाडे, उपसरपंच संतामन शिंदे, मुळाखोरे दुध संस्थेचे अध्यक्ष गोरक्षनाथ गाडे यांसह ग्रामपंचायत, सेवा संस्था, दूध संस्थेच्या पदाधिकार्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
——————————————-
आ. तनपुरे यांच्या काळात बारागाव नांदूर परिसरात १७ कोटीचा निधी
बारागाव नांदूर गावात अंतर्गत रस्ते, वीज रोहित्र, बंधार्यांवरील छोटे पूल, स्मशान भुमी व कब्रस्तानसाठी निधी, शाळेला निधी असे अनेक कामांची यादी वाचवून दाखवित प्रस्ताविक भाषणामध्ये सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष विश्वास पवार यांनी आ. तनपुरेंनी भरभरून निधी दिला असल्याने ग्रामपंचायत, मुळाखोरे खालेश्वर दूध संस्था व सेवा संस्थेच्या पदाधिकार्यांसह सर्व ग्रामस्थ आ. तनपुरेंना विक्रमी मताधिक्य देऊ असे सांगितले.