ब्राम्हणी : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोणी झाले तरी, प्राजक्ता हे त्यांचे लाडके असणार आहेत. मनापासून काम करण्याची पद्धत व सालस स्वभावाने ते सर्वांची मने जिंकतात. असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.
आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सायंकाळी ब्राह्मणीत आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
आम्हाला मंत्री होण्यासाठी तीन टर्म लढावे लागले. राहुरीकरांना मात्र पहिल्याच प्रयत्नात मंत्री पदाची संधी मिळाली. आता महाविकास आघाडी सरकार आल्यास आपल्याला कॅबिनेट मंत्री पद मिळणार आहे. त्यामुळे प्रचंड मताधिक्याने आमदार तनपुरे यांना निवडून द्या असे आवाहन थोरात यांनी केली.
पुढे बोलताना आमदार थोरात म्हणाले की,बटेंगे तो कटेंगे या महायुतीच्या घोषणेचा आमदार थोरात यांनी चांगला समाचार घेतला.बटेंगे तो कटेंगे चा नारा देवून जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचं काम भाजप करत आहे.बटेंगे तो कटेंगे ऐवजी महागाई व विकास कामावर बोला असा सवाल आ.थोरात यांनी उपस्थित केला.
ब्राह्मणी परिसराने आमच्या तनपुरे परिवारावर भरपूर प्रेम केले. गत निवडणुकीत विधानसभेत पाठवण्यासाठी मोलाची मदत केली.त्या ऋणातून उतराई म्हणून पाच वर्ष प्रामाणिक काम केले. भविष्यात आणखी काम बाकी आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान पाच वर्षात मतदार संघासह राज्यात केलेल्या कामांची माहिती आमदार प्राजक्त तनपुरे यांनी उपस्थित मतदारांना जिल्हा बँकेतील गोंधळ पाहता 23 तारखेचा निकाल लागताच चेअरमन बदलून नियमानुसार नोकर भरती करणार असल्याचे आ. तनपुरे म्हणाले.
आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला थोरात यांच्या रूपाने मुख्यमंत्री पदाची संधी मिळणार आहे.असल्याचे म्हणत घनश्याम शेलार यांनी थोरात यांचा भाषणात भावी मुख्यमंत्री म्हणून वारंवार उल्लेख केला. श्रीगोंदा तालुक्यात आम्ही म्हणतात सब स्टेशन मंजूर केले. मतदारसंघाच्या पलीकडे काम करणार नेतृत्व राहुरी करांना मिळाले असल्याचे शेलार म्हणाले.
सभेचे अध्यक्ष डॉ. विठ्ठलराव मोकाटे गुरुजी हे होते.
प्रास्ताविक डॉ. राजेंद्र बानकर यांनी केले.यावेळी
सुरेश वाबळे, काँग्रेसचे घनश्याम शेलार, रावसाहेब चाचा तनपुरे, शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे,प्रहाराचे सुरेश लांबे,अध्यक्ष एमडी सोनवणे, शिवसेनेचे सचिन म्हसे, सुनील अडसुरे, धीरज पानसंबळ, बाळासाहेब देशमुख,रंगनाथ मोकाटे,शब्बीर शेख,बाळासाहेब शेळके,माणिकराव तारडे,सचिन ठुबे, शांताराम हापसे,गणेश तारडे,बाळासाहेब वाकडे,महेश हापसे, दिपक हापसे,शेखर मोकाटे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.