राहुरी- नगर – पाथर्डी विधानसभा मतदार संघातील प्रमुख प्रतिस्पर्धी विद्यमान आ. प्राजक्त तनपुरे व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यात लढत होत आहे…
गत 15 दिवसापासून गावोगावी जावून महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी प्रचार केला.बहुतेक ठिकाणी जाहीर प्रचार सभा झाल्या.यामध्ये एकमेकांवर जाहीर टीका करण्यात आली. एकमेकांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पोस्टरच्या माध्यमातून प्रचार केला. व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर शाब्दिक प्रहार केला.आता आज सोमवारी जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. प्रचाराच्या तोफा आज सायं 5 पर्यंत थंडवणार आहेत.दररोज मतदार व कार्यकर्त्यांनी उमेदवार व त्यांच्यासोबत व्यासपीठावर असणाऱ्या व्यक्तींची तीच. तीच भाषणे प्रत्येक सभेत ऐकली. त्यामुळे आजच्या शेवटच्या जाहीर सभेत दोन्ही बाजूकडील उमेदवार व प्रमुख कार्यकर्ते नेमकी काय बोलणार? भाषणातील मुद्दे नेमकी काय असणार! याकडे राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागून आहे.