Home Blog आ.तनपुरेंना धनगर समाजाचा पाठींबा – तमनर

आ.तनपुरेंना धनगर समाजाचा पाठींबा – तमनर

7
0

राहुरी – प्राजक्त दादा तनपुरे यांना धनगर समाजाच्या वतीने जाहीर पाठींबा व्यक्त करण्यात आला.आम्ही कामाच्या पाठी मागे असून मतदार संघातील सर्व समाज बांधवानी महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांना एकमुखी पाठींबा देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे धनगर समाजाचे नेते व पंढरपूर येथे उपोषणास बसलेले यशवंत सेनेचे अध्यक्ष विजय तमनर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकी मध्ये धनगर समाजाने माननीय नामदार प्राजक्त दादा तनपुरे यांनाच का मतदान करावे?याचा मोठा खुलासा धनगर समाज कार्यकर्ते व पंढरपूर येथील धनगर समाज उपोषण करते यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजय तमनर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला आहे.
यावेळी धनगर समाजाचे गंगाधर तमनर, के पी वडितके, नानासाहेब जुधारे, सदाशिव उर्फ भारी सरोदे, दत्तात्रय खेडेकर, अप्पासाहेब सरोदे, भारत मतकर, काशिनाथ सरोदे, कैलास केसकर,भागवत झाडे आदि समाजाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

विजय तमनर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मला वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवारी होती परंतु सर्व समाज बांधवांनी आग्रह धरला की आपण निवडून येणार नाहीत तर आपल्या तालुक्याची हानी कशाला करता म्हणून प्राजक्त दादा तनपुरे यांना पाठिंबा देऊन निवडून आणता येईल असे सर्वनुमते ठरले यासाठी अर्ज मागे घेऊन आम्ही पाठिंबा दिला आणि २०१९च्या निवडणुकीत प्राजक्तदादा तनपुरे विजयी झाले त्याची जाणीव म्हणून व आमच्या समाजाशी त्यांची नेहमीच असलेली कौटुंबिक बांधिलकी या नात्याने त्यांनी धनगर समाजासाठी भरीव असे योगदान दिले.

त्यामध्ये प्रामुख्याने धनगर समाजाच्या विकासासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी या संस्थेस राहुरी नगरपालिकेकडून १० गुंठे जागा इमारत व विस्तारित बगीचा “अहिल्याभवन” साठी उपलब्ध करून दिले व अहिल्याभवन येथे पुस्तकासहित,अभ्यासिका व विद्यार्थी मार्गदर्शन केंद्रासाठी आमदार साहेब कायम सहकार्य व योगदान देत आहेत
मुळा धरणातून वावरथ जांभळी,जांभुळबन या गावांना जोडण्यासाठी ११० कोटी रुपयांचा पूल मंजूर करण्यासाठी जलसंपदा खाते व सार्वजनिक बांधकाम खाते यांच्याकडे पाठपुरावा करून पुलाचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यासाठी शासनाकडून १९ लाख रुपये मंजूर करून ते पूर्ण केले व पुढील काम अंतिम टप्प्यात आणण्यात त्यांचेच मोठे योगदान.वावरथ-जांभळी, जांभूळबन या गावासाठी स्वतंत्र ५.५ कोटी रुपयांचे सबस्टेशनचे काम पूर्ण केले
वावरथ जांभळी या गावांसाठी एक कोटी रुपयांची यांत्रिक बोट मंजूर केली की ज्यामधून चार चाकी वाहनाने बोटीतून प्रवास करता येणार आहे बोटीचे काम पूर्ण झाले असून थोड्याच दिवसात बोट कार्यान्वित होणार आहे.चिखलठाण,मांजरी,वांजुळपोई या धनगर बहुल गावांसाठी स्वातंत्र्य सबस्टेशन कार्यान्वित केले आहे.

वावरथ येथील खिल्लार वाडा येथे सभामंडप दिला,वरवंडी येथे शिंगाडे वस्ती येथे सभामंडप दिला.घोरपडवाडी येथे १२.५ लाख रुपयांचा बिरोबा मंदिर येथे सभा मंडप दिला.
शेरी चिखलठाण येथील सभामंडप दिला.
धनगर समाजातील सर्व वाड्या वस्त्यांचा तांडा वस्ती मध्ये समावेश केला.
धनगर समाज मेंढपाळ बांधवावरील अन्यायाच्या विरोधात प्राजक दादा तनपुरे कायम समाजासोबत. दरडगाव थडी येथील भाऊसाहेब भिवा गलांडे या समाज बांधवाचे भर पावसाळ्यात वनविभागाने शेती व घर उध्वस्त केले यावेळी आपले मंत्रिपद असताना शासनाच्या विरोधात जाऊन समाज बांधवांच्या पाठीशी उभे राहिले.

वनविभागाचा अधिकारी देवखिळे यांच्यावर हक्कभंग आणला.घोरपडवाडी येथील रामा बाचकर यांच्या शेतीवर असणाऱ्या अतिक्रमणाबाबत दोन्ही समाजात बैठक घेऊन धनगर समाज बांधवास न्याय मिळवून दिला.घोरपडवाडी येथील मेंढपाळ भगिनीवर अत्याचार करणाऱ्या मुजोर वनविभागाच्या अधिकाऱ्याचे निलंबन करून गुन्हा दाखल केला.धनगर समाजाच्या घरकुलासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून १७ घरकुल आपल्या राहुरी मतदार संघात मंजूर केले.
वन विभागाच्या लगत असणाऱ्या अधिकाऱ्यांशी समन्वय करून पाईपलाईन,रस्ते,पाणी यासाठी अनेकदा बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावले.
मेंढपाळ बांधवांना चराईसाठी वनविभाग तसेच कृषी-विद्यापीठ या ठिकाणी कायमचे सहकार्य असते.

गोटुंबे आखाडा येथील अतिक्रमणग्रस्त बांधवांसाठी शासन स्तरावर कायमच अथक प्रयत्न चालू.मुळा धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त धनगर समाज बांधव यांचा नोकरीसाठी समावेश करावा यासाठी शासन स्तरावर अथक प्रयत्न चालू.धनगर समाजाच्या सामाजिक आंदोलनात कायमस्वरूपी महत्त्वाची भूमिका तनपुरे साहेब बजावीत असतात.भविष्यात देखील धनगर समाजासाठी व धनगर समाजातील विद्यार्थ्यांना करिता चांगल्या योजना तालुका स्तरावर राबवण्याचे प्राजक्तदादा यांच्या विचाराधीन असल्याचे कायमच त्यांच्या चर्चेतून समोर.तनपुरे कुटुंबीयांकडून धनगर समाज बांधवांना राजकीय प्रक्रियेमध्ये कायमच मानाचे स्थान दिलेले आहे.
धनगर समाजाचे बाबासाहेब भिटे यांना जिल्हा परिषद अध्यक्ष,सौ.कौसल्याबाई विटनोर जिल्हा परिषद सदस्य,सौ.ताराबाई शिवाजी विटनोर सभापती महिला व बालकल्याण समिती,मुक्ताजी खाटेकर पंचायत समिती सदस्य, राहुरी,कै.भाऊसाहेब विटनोर सभापती पंचायत समिती,राहुरी,कै.भाऊसाहेब पारखे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,राहुरी
कै. तुकाराम चीतळकर संचालक बाभळेश्वर दूध संघ,कै.तुकाराम सखाराम तमनर तुकाराम डॉ तनपुरे सहकारी साखर कारखाना
कैलास केसकर संचालक राहुरी मार्केट कमिटी रावसाहेब दादा तमनर संचालक मार्केट कमिटी राहुरी,भास्कर काळनर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी,सौ.बेबीताई सोडणार सभापती पंचायत समिती राहुरी,गंगाधर पाटील तमनर चेअरमन-देखरेख संघ राहुरी. संचालक-सूतगिरणी विभाग राहुरी.

संचालक-डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखाना राहुरी,राणोजी सरोदे राहुरी नगरपालिका सदस्य,भारीभाऊ सदाशिव सरोदे राहुरी नगरपालिका सदस्य,कचरू चितळकर संचालक डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखाना,रामदास बाचकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी कै.काशिनाथ खेडेकर उपनगरध्यक्ष राहुरी नगरपालिका,रावसाहेब तमनर संचालक बाभळेश्वर दूध संघ,भाऊसाहेब भांड,संचालक मार्केट कमिटी राहुरी आदि पदे समाजाला दिली.

त्यामुळे या पत्रकार परिषदेद्वारे आपणाला जाहिर आव्हान करण्यात येत आहे की नगर,पाथर्डी,राहुरी या मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय प्राजक्त प्रसाद तनपुरे यांच्या दोन नंबर वरील तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या तालुक्यातील हक्काचा उच्चशिक्षित संस्कारक्षम,तरुण नेतृत्वाला विजयी करून विधान सभेमध्ये आपले प्रश्न मांडण्यासाठी पाठवावे असे आवाहन धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here