Home अहमदनगर माझा प्राजक्त जनतेचा कधी झाला हे कळलच नाही- डॉ.उषाताई तनपुरे

माझा प्राजक्त जनतेचा कधी झाला हे कळलच नाही- डॉ.उषाताई तनपुरे

7
0

राहुरी: भाजपाच्या राहुरी मतदारसंघातील उमेदवारावर जेवढे गुन्हे दाखल आहेत. त्या प्रकरणातील सर्वच हिंदू धर्मातले असताना स्वतःला हिंदू धर्माचे रक्षक समजणारा विरोधी उमेदवार हिंदू धर्माचा रक्षक नव्हे भक्षक असल्याचा घणाघाती आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी येथील प्रचाराच्या सांगता सभेत केला.

सोमवारी दुपारी महाविकास आघाडीच्या वतीने शहरात भव्य प्रचार सांगता रॅली काढण्यात आली. राहुरी मार्केट कमिटी पासून सुरू झालेली रॅलीचे नवी पेठेत झालेल्या या सभेत रूपांतर झाले. राहुरी शहरासह तालुक्यातून व नगर, पाथर्डी भागातून मोठ्या संख्येने तनपुरे समर्थक व आघाडीचे विविध पक्ष संघटनांचे नेते पदाधिकारी उपस्थित होते.

आ. तनपुरे यांनी आपल्या केवळ २५ मिनिटांच्या भाषणात आपल्या पाच वर्षातील कार्याचा आलेख उपस्थितितांना वाचून दाखवत राहुरी-नगर-पाथर्डी म तदारसंघातील जनता ही माझ्या कुटुंबातील सदस्य मानत असल्याचे म्हणत पाच वर्षांपूर्वी मी नवीन होतो. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मला मंत्री पदाची संधी दिली.

या मंत्रिपदाच्या काळात अनेक कामे करत वर्धा व चंद्रपूर जिल्ह्याची ही जबाबदारी सांभाळली. मंत्रीपद असताना उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत पाहिली, ऊर्जा खात्याच्या माध्यमातून अनेक कामे केली, निळवंडे कालव्याचे काम केले, शेती, सबस्टेशन तसेच नगर, पाथर्डी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांची ही कामे केली. समोरच्या उमेदवाराने राहुरी शहरातील शनि मंदिरासमोर दंड थोपटण्यापेक्षा समोरासमोर चर्चेला येण्याचे आवाहनही प्राजक्त तनपुरे यांनी केले. डॉ. उषाताई तनपुरे म्हणाल्या की, माझा प्राजक्त कधी जनतेचा झाला हे कळलेच नाही. प्राजक्त नगराध्यक्ष असताना शहरातील अनेक विकास काम केली. आमदारकीच्या काळात राहुरी शहरातील तुळजाभवानी माता, राहुरी नगरपालिका तसेच राहू केतू, तिन्ही ठिकाणी भव्य कमान तयार केले. नवीन पाणी योजना, भुयारी गटार योजना,भव्य जॉगिंग ट्रॅक, बसस्थानक एवढेच नव्हे तर व्यक्तिगत पातळीवर अनेक सरकारी योजना व वैद्यकीय कामे सर्वसामान्यासाठी केली.

 

यावेळी मा.खासदार प्रसादराव तनपुरे, रावसाहेब खेवरे, रावसाहेब चाचा तनपुरे, अरुण तनपुरे, हर्ष तनपुरे, बाबासाहेब भिटे, गोविंद मोकाटे, प्रकाश देठे, अभिषेक भगत, मचे सर, रघुनाथ झीने, मच्छिंद्र सोनवणे, किसन जवरे, प्रशांत नवले, नितीन बाफना,सचिन म्हसे, विजय शिरसाठ, पोपट शिरसाठ, डॉ. संजय म्हसे, विजय डौले, विजय तमनर, गंगा तमनर, रावसाहेब पवार, सुनिल निमसे, गोरख पाटोळे, बाळासाहेब जठार, नितिन तनपुरे, डॉ. भळगट, राम तोडमल, गेणुभाऊ तोडमल, रफिक शेख, आयुब पठाण आदी उपस्थित होते. यावेळी सुत्रसंचालन संतोष आघाव यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here