अहिल्यानगर : जिल्ह्यासह नेवासा तालुक्यातील प्रसिद्ध सोनई मार्केटमध्ये शनिशिंगणापूर रस्त्यावर उभारण्यात आलेल्या ‘जगदंबा टेक्सटाईल्स’ या भव्य-दिव्य वस्त्रदालनाचा शुभारंभ नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वकाळात सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता गुरुवर्य महंत ह.भ.प. उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या शुभहस्ते होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक शंकररावजी गडाख राहणार आहेत.
या शुभारंभ सोहळ्यास संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त विश्वासमामा गडाख, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरदराव गडाख, ह.भ.प. निवृत्ती महाराज मतकर, जिल्हा परिषद अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनीलभाऊ गडाख, दत्तभक्त सद्गुरू मोहनराव महाराज तसेच प्रसिद्ध कांदा आडतदार सुदामराव तागड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या शुभारंभ सोहळ्यास नागरिकांनी, व्यापारी बांधवांनी, महिला भगिनींनी तसेच ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्या व्यवसायाला सदिच्छा व आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन भाऊसाहेब आदमने, महेश आदमने व अभिषेक आदमने परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
सर्वांच्या पसंतीचे ‘वन स्टॉप’ वस्त्रदालन!
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या दोन उच्चशिक्षित तरुणांनी वस्त्रोद्योग क्षेत्रात आत्मविश्वासाने नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. सोनई गावचे ग्रामदैवत जगदंबा माता मंदिर परिसरात उभारण्यात आलेली ‘जगदंबा टेक्सटाईल्स’ची आकर्षक व भव्य वास्तू सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
सोनईच्या बाजारपेठेत कपड्यांची अनेक दुकाने असली, तरी ग्राहकांची बदलती आवड, आधुनिक फॅशन, दर्जा आणि योग्य दर यांचा सुंदर मेळ साधत ‘जगदंबा टेक्सटाईल्स’ ग्राहकांच्या सेवेत दाखल होत आहे.
‘जगदंबा टेक्सटाईल्स’मध्ये नवीन ब्रँडेड, आकर्षक आणि दर्जेदार कपड्यांची विविधांगी रेंज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिलांसाठी मनमोहक व फॅशनेबल भारी साड्यांची आकर्षक कलेक्शन, तरुणांसाठी आधुनिक फॅशनचे शर्ट, टी-शर्ट, पॅन्ट, जीन्ससह विविध प्रकारचे स्टायलिश कपडे, तसेच पुरुष, महिला आणि युवक-युवतींसाठी काळानुरूप नवनवीन डिझाईन्स उपलब्ध राहणार आहेत.
लग्नसमारंभ, साखरपुडा, वाढदिवस, गृहप्रवेश, धार्मिक कार्यक्रम, कौटुंबिक सोहळे आणि विविध मोठ्या समारंभांसाठी एकाच छताखाली कपड्यांची मोठी रेंज उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांना खरेदीसाठी इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही.
होलसेल दरात दर्जेदार कपड्यांची खरेदीची संधी!
विशेष म्हणजे होलसेल दरातील आकर्षक किंमती, योग्य भाव, दर्जेदार माल आणि भरपूर व्हरायटी ही ‘जगदंबा टेक्सटाईल्स’ची प्रमुख वैशिष्ट्ये असणार आहेत. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आवडीनुसार कपड्यांची निवड करता यावी, यासाठी विविध प्रकारचे कलेक्शन येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
‘दर्जा उत्तम, किंमत योग्य आणि कलेक्शन भारी’ या संकल्पनेतून ग्राहकांना विश्वासार्ह खरेदीचा अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
सोनईसह नेवासा तालुका आणि परिसरातील ग्राहकांसाठी नवीन ब्रँडेड कपडे, आकर्षक डिझाईन्स, उत्तम दर्जा आणि परवडणाऱ्या दरांचे नवे ठिकाण म्हणून ‘जगदंबा टेक्सटाईल्स’ आपली स्वतंत्र ओळख निर्माण करेल, असा विश्वास आदमने परिवाराने व्यक्त केला आहे.
नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वकाळात सुरू होणाऱ्या या नव्या वस्त्रदालनाच्या शुभारंभ सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आदमने परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.













