सोनई : शनिवार दि १० ऑक्टोबर रोजी शनि अमावस्या असल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात सोमवार दि ५ रोजी शनिशिंगणापूर देवस्थान व शासकीय स्तरावरील विविध प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमुक्का यांनी स्वत वाहनतळ, दर्शन रांग व मंदिर परिसराची पाहणी करत सूचना केल्या. देवस्थानचे मुख्य कार्यकारी अतुल चोरमारे यांनी विविध कामाचा आढावा घेऊन संबधित अधिका-यांना सूचना केल्या.
पिण्याचे पाणी,स्वच्छता , आरोग्य , माहिती फलक, दर्शन रांग यासारखे अन्य नियोजना संदर्भात बैठकीत चर्चा झाली. शनी मंदिरा पासून सुमारे २ कि मी अंतरावर वाहनतळ असणार आहे.
पूर्ण दिवस शनीअमावस्या असल्याने लाखो भाविक शनि दर्शनासाठी येणार असल्याचा अंदाज आहे. त्यामूळे देवस्थान प्रशासन व सरकारी यंत्रणा यांनी आतापासून नियोजन चालू केले आहे.
या बैठकीस तहसीलदार संजय बिरासदार, तालुका आरोग्य अधिकारी बी एन दहिफळे , शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक धनवटे, सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, देवस्थानचे अधीक्षक लक्ष्मण वाघ, जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले यांच्यासह देवस्थानचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होत.













