अहिल्यानगर : महापालिका निवडणुकीआधीच राजकीय भाजप राष्ट्रवादीने विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीलाच महायुतीचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने शहराच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप राष्ट्रवादी महायुतीने शहराच्या राजकारणात ठोस पकड निर्माण केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
प्रभाग क्रमांक सातमधून पुष्पां अनिल बोरुडे, तर प्रभाग क्रमांक सहामधून करण कराळे आणि सोनाबाई शिंदे हे भाजपचे तीन उमेदवार कोणताही सामना न होता विजयी ठरले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)नेही निवडणुकीत खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक 8 मधून कुमार वाकळे आणि प्रभाग क्रमांक 14 मधून प्रकाश भागानगरे हे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.













