गणराज्य राहुरी : महाशिवरात्री उत्सव येत्या १५ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. या निमित्त राहुरी शहरातील वैजिनाथ मित्र मंडळाच्या वतीने तीन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ओंकार कासार यांनी दिली.
दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी वैजिनाथ मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत महाशिवरात्री उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी अथर्व कोरडे, उपाध्यक्ष पदी सिद्धार्थ चौहान, कार्याध्यक्ष रोहित बोरुडे व सिद्धार्थ दुधाडे, खजिनदार तेजस लुक्कड तर सचिव पदी सूरज घाडगे व रोनक सूराणा यांची निवड करण्यात आली.
बैठकी दरम्यान महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात करण्याचे ठरवण्यात आले असून महाशिवरात्री व जीर्णोद्धार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या सोहळ्यास प. पु. सदगुरु श्री दत्तदासजी महाराज (श्री दत्तधाम पीठ गोवर्धन नाशिक), योगीनाथ निरंजन नाथ (श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे प्रमूख विश्वस्त), महंत हभप श्री अर्जुन महाराज तनपुरे (मठाधीपती श्री कवी महिपती महाराज देवस्थान ताराहाबाद राहुरी), श्री गुरुवर्य मस्तनाथजी महाराज (माया मछिंद्रनाथ देवस्थान नाथयोगी परिवार नालेगाव), श्री ओंकार स्वामीजी (ओंकारस्वामी धाम सगमनेर) यांच्या दिव्य उपस्थितीत महाशिवरात्री उत्सव व जीर्णोद्धार सोहळा पार पडणार आहे.
दरम्यान शनिवार दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्सवाचे ध्वजारोहण करण्यात येईल. रविवार दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्री च्या दिवशी पहाटे ४ वा. रुद्र अभिषेक होणार. सकाळी महाआरती व होम हवन होईल. सकाळी ९ वा. आरती व प्रसाद वाटप होणार. संध्याकाळी ६.३० वा. श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे प्रमूख विश्वस्त गुरूवर्य योगीनाथ निरंजन नाथ यांच्या हस्ते महाआरती व आरती नंतर शिवमहात्म विषयावर मार्गदर्शन होणार आहे. रात्री ९ वाजता शोभेचे फटाकेची आतिशबाजी कार्यक्रम होणार आहे. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११ ते १.३० पर्यंत अखंड जल अभिषेक करण्यात येणार. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी जीर्णोद्धार सोहळ्याचे सदगुरु दर्शन व मिरवणूक आणि काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वा. सदगुरु प.पु. श्री दत्तदासजी महाराज यांची श्री मस्तनाथजी महाराज व ओंकार स्वामीजी यांच्या उपस्थितीत मिरवणूक पार पडणार. व ११.३० वाजता जिर्णोधर सोहळा धर्मव महा आरती आणि सद्गुरू दर्शन होणार व धर्मध्वज स्थापना सोहळा पार पडणार आहे. सांयकाळी ५ वा. महंत हभप श्री अर्जुन महाराज तनपुरे (मठाधीपती श्री कवी महिपती महाराज देवस्थान ताराहाबाद राहुरी) यांचे काल्याचे कीर्तन व ६.३० वा महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
या सर्व कार्यक्रमाचचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष ओंकार कासार यांनी केले.
बैठकी दरम्यान मा. नगराध्यक्ष अनिल कासार, अशोक स्वामी जंगम, रमेश लुक्कड, किशोर रोडे, उमेश भुजाडी, सुनिल निमसे, संजय सुराना, महेश जंगम, निरज चौहान, अवि ठोकळे, आकाश गुलदगड, किरण तोडमल, रोहित परदेशी, गणेश ढोले, रोहन बोरुडे, स्वप्नील भालेकर, सचिन बोराडे, गौरव महाले, ऋषी बोरुडे, गोविंद दहिवाळकर, विशाल जंगम, अक्षय सदाफळ, सुरज घाडगे, राज तनपुरे, सिधु चौहान, श्रीकांत घाडगे, अमोल रणशिंग, सौरभ दुधाडे, प्रणव मुथोडे, राजू गुलदगड, सुजल नगरकर, अनिकेत शिंदे, सिंधु दुधाडे, प्रथम जंगम, भाविन सुराणा, गिरीश अग्रवाल, भाऊ करपे, स्वराज शहाणे, लखन राऊत, बापू ढोले, अमोल जंगम, कृष्णा पोपळघट, हर्षदीप सुराणा, सागर ततार, दिपक दहिवाळकर, अमृत दहिवाळकर, दादा तांबोळी, पंकज बोबडे, आकाश कोरडे, शुभम भडकवाल, गणेश भडकवाल, कमलेश गुप्ता, संतोष आघाव, बंटी धनवटे, काका नहार, विशाल गुप्ता, प्रसाद देवकर आदी उपस्थित होते.
महाशिवरात्री उत्सव निमित्त ३ दिवस होणाऱ्या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सकल हिंदु समाज व मंडळाचे सर्व सभासद विशेष परिश्रम घेत आहेत.











