राहुरी : गत दोन महिन्यापूर्वी चोरीस गेलेले सुमारे १५ लाख रुपये किमतीचे १०.५ तोळे सोने मूळ मालकास पुन्हा देण्यात राहुरी पोलिसांना यश आले.
राहुरी येथे राहणारे भास्कर भागवत कोळी फिर्यादीवरुण दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 1353/2025 BNS 305(अ ) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला होता .
सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलिस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी करून गुन्ह्यात चोरी गेलेले सुमारे १५ लाख रुपये किमतीचे सोने जप्त करून ते आज मंगळवार १० फेब्रुवारी रोजी अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश,पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे , अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलबुरमे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे सर, उप विभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांचा उपस्थितीत अपर पोलीस महासंचालक श्री कृष्ण प्रकाश सर यांचे हस्ते फिर्यादी यांना परत करण्यात आले आहे.
प्रसंगी फ़िर्यादी यानी राहुरी पुलिस स्टेशन चे पथक व स्थानिक गुन्हे शाखा चे पथक यांचे आभार मानून कौतुक केले.











