गणराज्य न्यूज: राहुरी – विठ्ठल रुक्मिणी यात्रा कंपनी आयोजित भंडारदरा व कळसूबाई दर्शन व पर्यटन मंगळवार 21 जुलै रोजी एक दिवसीय ट्रिपचे नियोजन करण्यात आले असून इच्छुकांनी आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन आयोजक नितीन काळे गुरु 9604104845 यांनी केली आहे.
21 जुलै रोजी पहाटे 5 वाजता ट्रिप निघणार आहे..
प्रति व्यक्ती फक्त 850 रुपये खर्च आहे.यामध्ये दोन वेळा चहा,एक टाइम जेवण,पिण्यासाठी सोबत थंडगार शुद्ध पाणी मिळणार आहे.फक्त आपला एक वेळचा जेवणाचा डबा सोबत घ्यायचा आहे. ट्रिपसाठी आपली नाव नोंदणी करताना 350 रुपये भरावे..
महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर असलेल्या कळसूबाई (उंची: ५,४०० फूट) ट्रेकिंग आणि पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना एक उत्तम अनुभव मिळणार आहे. हिरवेगार डोंगर, धुक्याची चादर आणि अवघड कड्यांवर चढण्यासाठी लावलेल्या लोखंडी शिड्या हे या ट्रेकचे मुख्य आकर्षण आहे.
भंडारदरा धरण हे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीवर स्थित आहे। ब्रिटिशकालीन हे धरण आशिया खंडातील सर्वात मोठ्या दगडी धरणांपैकी एक आहे। धरणाची एकूण क्षमता ११.०३ टीएमसी (११०३९ दलघफू) इतकी असून आहे.. या ट्रिपच्या माध्यमातून धरण पाहण्याचा आनंद मिळणार आहे....
ग्रुपच्या माध्यमातून फक्त 850 रुपयात एकदिवसीय अविस्मरणीय आनंद मिळणार आहे….तरी आपली शीट त्वरित बुक करा असे आवाहन विठ्ठल रुक्मिणी यात्रा कंपनीच्या संचालिका सौ.पल्लवी नितीन काळे यांनी केले आहे.











