वांबोरी- वाल्मिकी वाल्मिकी ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनीचा उद्घाटन सोहळा व कंपनी अंतर्गत तूर,मूग,उडीद सोयाबीन व कापूस या शेतमाल खरेदीचा शुभारंभ नवरात्र उत्सवाच्या पर्वकाळात शुक्रवार 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता गुरुवर्य ह.भ.प पुंडलिक महाराज जंगली शास्त्री यांच्या हस्ते व संत सेवाधाम वारकरी संस्थेचे प्रमुख हभप किशोर महाराज गडाख यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.
याप्रसंगी जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, आत्माचे प्रकल्प संचालक राजाराम गायकवाड, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे,मंडल कृषी अधिकारी विनया बनसोडे, राहुरी तालुका आत्माचे सुजित गायकवाड,पवन थोरात, क्रांती चौधरी,अमोल आंधळे, वांबोरी सेंट्रल बँकेचे मॅनेजर सुरज शिरसाठ आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वाल्मिकी ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष गणेश ससे,सचिव नामदेव ससे व संचालक मंडळ तसेच सभासदांनी केले आहे.
उद्घाटन सोहळा दरम्यान कृषी सहाय्यक थोटे मॅडम, ढोकचवळे मॅडम,गावडे मॅडम, बाचकर सर, धामोरे सर,भालेराव सर, शिंदे सर, कदम सर, पवार सर,प्रथम सभासद राजेंद्र येवले,आशुतोष धूमने, केळकेंद्रे सर, डॉ.उल्हास सुर्वे,डॉ. नितीन उगले, वाल्मिकीचे संचालक सोमनाथ तोडमल धोंडे,नामदेव ससे,गणेश ससे, आशुतोष धोंडे, संदीप गांधले,प्रवीण गांधले, दत्तात्रय गायकवाड, रेवनाथ ससे आदी आपल्या स्वागतासाठी सज्ज आहेत.
गत दोन वर्षापासून वाल्मिकी ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी कृषी क्षेत्राशी निगडित काम करत आहे. शेंद्रीय शेती हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण उपक्रम व कार्यक्रम राबविले जात आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी भविष्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या वाल्मिकी ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या या उद्घाटन सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.