Home महाराष्ट्र काळाबाजार रोखण्यासाठी छापा

काळाबाजार रोखण्यासाठी छापा

9
0

 

अहिल्यानगर : – शहरातील एमआयडीसी परिसरात अन्नधान्य वितरण विभागाच्या संयुक्त पथकाने अचानक टाकलेल्या धाडीत घरगुती गॅस सिलिंडरचा अनधिकृत साठा उघडकीस आला असून ९ सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर व काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या निर्देशानुसार गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकांद्वारे विविध ठिकाणी नियमित तपासण्या सुरू आहेत.

या मोहिमेअंतर्गत ५९ हॉटेल्स व ६ गॅस वितरक संस्थांची तपासणी करण्यात आली. या संपूर्ण कारवाईत एकूण ११ सिलिंडर जप्त करण्यात आले असून धाडीत ते ताब्यात घेण्यात आले आहेत. घरगुती वापरासाठी असलेले सिलिंडर अनधिकृतरीत्या साठवून ठेवणे नियमबाह्य असून यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना कृत्रिम टंचाईला सामोरे जावे लागते.

​सदर कारवाई नगर शहराच्या अन्नधान्य वितरण अधिकारी सपना भोवते, नगर तालुक्याचे पुरवठा निरीक्षण अधिकारी शिवराज पवार, राहुरीचे पुरवठा निरीक्षण अधिकारी सुदर्शन केदार, बीपीसीएल कंपनीचे जिल्हा समन्वय अधिकारी राजकुमार मिश्रा, नगर शहराचे पुरवठा निरीक्षक तेजस पाटील, महसूल सहाय्यक अक्षय एकशिंगे व वाहनचालक योगेश शहाणे यांच्या पथकाने केली.

जिल्ह्यातील गॅस वितरण व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी प्रशासनाकडून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार आहेत. अनधिकृत साठा किंवा घरगुती गॅसचा गैरवापर आढळल्यास नागरिकांनी तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here