गणराज्य न्यूज ब्राह्मणी : ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल श्री.महेंद्र नारायण तांबे यांचा ब्राह्मणी जिल्हा परिषद शाळेच्यावतीने आज बुधवारी सकाळी सन्मान करण्यात आला.
यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ. सुवर्णा बानकर, भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, शिवकांत राजदेव,व्हाइस चेअरमन अनिल दत्तात्रय ठुबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सयाजी कर्डिले,उपाध्यक्ष राहुल मोकाटे, विजय तेलोरे, मुख्याध्यापक एस एल नरवडे आदीसह ब्राम्हणी झेडपी शाळेसह बनकर वस्ती मानमोडी वस्ती, घेरूमाळ वस्ती,बहिरोबा क्लासेस या शाळेतील शिक्षक उपस्थित होते.दरम्यान मान्यवर पाहुण्यांची भाषणे झाली. मागील प्रमाणे पुढेही शाळेला कायम सहकार्य असेल.असे आश्वासन उपसरपंच तांबे यांनी दिले.













