गणराज्य न्यूज
ब्राम्हणी : बस स्टॅन्ड पासून गावात बाजार तळाकडे जाणारा महत्वपूर्ण रस्ता अशी ओळख असलेल्या मुख्य रस्त्याचे काम चार दिवसापासून सुरू आहे.त्याच 200 मिटर रस्त्याच्या कामाचे विविध टप्पे आहेत.ते पूर्ण होण्यासाठी काही दिवस पर्यायी रस्त्याचा वापर करून ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनास रस्ता मजबूत व टिकाऊ होण्यास मदत करावी असे आवाहन सरपंच प्राध्यापक सौ.सुवर्णाताई बानकर व ग्रामपंचायत प्रशासन यांच्याकडून करण्यात येत आहे.
आपला गावचा मुख्य रस्ता पुढील अनेक वर्ष टिकण्यासाठी चालू कामा दरम्यान सहकार्य करणे आपले कर्तव्य आहे.













