Home राहुरी शुक्रवार १६ पासून किर्तन महोत्सव

शुक्रवार १६ पासून किर्तन महोत्सव

3
0

ब्राम्हणी : श्री गणेश जयंती निमित्त सालाबादप्रमाणे ब्राह्मणी उंबरे केंदळ या गावांच्या शिवेवर सिद्धिविनायक मंदिर टेंभी येथे शुक्रवार 16 ते शुक्रवार 23 जानेवारी या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे.

यंदा सप्ताहाचे 21 वे वर्ष असून सप्ताह काळात रावसाहेब महाराज गायकवाड,देविदास महाराज आडभाई,निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर,हरिदास महाराज पालवे शास्त्री, गंगाराम महाराज राऊत, सोमनाथ महाराज पाटील,प्रवीण महाराज गोसावी आदी नामवंत महाराज मंडळींची दररोज सायंकाळी 7 ते 9 यावेळी जाहीर हरी किर्तन व महाप्रसाद होणार आहे. श्री गणेश जयंती निमित्त 22 जानेवारी रोजी श्रीकृष्णकृपांकित भागवताचार्य डॉ.विकासनंजी महाराज मिसाळ यांचे विशेष किर्तन होणार आहे.23 जानेवारी रोजी सकाळी रामायणाचार्य मनोहर महाराज सिनारे यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी भाविकांनी या आध्यात्मिक सोहळ्यात सहभागी व्हावे..असे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here