ब्राम्हणी : गावातील जागृत देवस्थान व परिसरातील सर्वांच श्रद्धास्थान श्री बहिरोबा महाराज यांच्या नवीन मंदिर व कलशारोहण सोहळ्यास उद्या रविवारी महाशिवरात्रीच्या पर्वदिनी एक वर्ष पूर्ण होत आहे.त्यानिमित्त प्रथम वर्धापन सोहळा पार पडणार आहे.
श्री बहिरोबा महाराज यांचा अभिषेक, ज्योत मिरवणूक व प्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तरी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामस्थ ब्राम्हणी यांच्याकडून करण्यात येत आहे.











