Home महाराष्ट्र मानोरीत बालाजी ग्रुपचा उपक्रम

मानोरीत बालाजी ग्रुपचा उपक्रम

2
0

मानोरी : राहुरी तालुक्यातील मानोरी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त बालाजी ग्रुपच्या वतीने प्रसिद्ध व्याख्याते प्रा.वसंत हंकारे यांचे ‘आई-बाप समजून घेताना’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता हनुमान मंदिर, मानोरी येथे हा कार्यक्रम होणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या ओजस्वी वाणीने लाखो श्रोत्यांच्या मनावर ठसा उमटविणारे तसेच छत्रपती पुरस्कार विजेते प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत हंकारे हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. आई-वडिलांचे महत्त्व, त्यांच्याप्रती असलेली आपली जबाबदारी, बदलत्या काळातील कौटुंबिक नातेसंबंध आणि पालकांचा आदर याबाबत ते प्रेरणादायी विचार मांडणार आहेत.

या व्याख्यानाचा परिसरातील नागरिक, युवक-युवती तसेच विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाचे रविंद्र आढाव, आण्णासाहेब तोडमल, वैभव पवार, संजय आढाव, उत्तम तनपुरे, प्रदीप भुसे व भास्कर देवकाते यांनी केले आहे. कार्यक्रमास तक्षज्ञ ज्युनिअर कॉलेज, आरडगाव यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाचे मीडिया सौजन्य पत्रकार गोविंद फुणगे यांचे असून, Govind Funage या फेसबुक पेजवर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here