Home Blog जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर

जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर

13
0

अहिल्यानगर (गणराज्य न्यूज) – दरवर्षीप्रमाणे यंदाही ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षक व केंद्र प्रमुखांना दिले जाणारे जिल्हा शिक्षक पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हाभरातून पारदर्शक निवड प्रक्रियेद्वारे १४ उपक्रमशील शिक्षक आणि २ उत्कृष्ट केंद्रप्रमुखांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या वतीने या पुरस्कार प्रक्रियेसाठी १०० गुणांची अद्ययावत प्रश्नावली जि.प. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. सहभागी शिक्षकांनी स्वयंमूल्यमापन करून प्रस्ताव सादर केले. प्राप्त प्रस्तावांची गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांच्यामार्फत छाननी होऊन प्रत्येक तालुक्यातून ३ शिक्षक (त्यामध्ये १ शिक्षिका अनिवार्य) व १ केंद्रप्रमुख यांचे प्रस्ताव जिल्हा कार्यालयाकडे पाठवण्यात आले.

निवड प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राहण्यासाठी जिल्हा स्तरावरून इतर तालुक्यांतील अधिकाऱ्यांचे तपासणी पथक तयार करून प्रत्यक्ष पाहणी व मूल्यमापन करण्यात आले. याशिवाय सर्व पात्र शिक्षक व केंद्र प्रमुखांची २५ गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे मख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड समितीच्या बैठकीत पथकाचे १०० गुण व लेखी परीक्षेचे २५ गुण अशा एकूण १२५ गुणांपैकी सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत शिक्षकांची अंतिम निवड करण्यात आली.

यामध्ये सुमन खतोडे उपाध्यापिका जि. प. शाळा नवलेवाडी अकोले.

दिपाली काशिनाथ रेपाळ, उपाध्यापिका जि. प. शाळा जाखुरी संगमनेर.

सुनिल किसान पोरे उपाध्यापक, जि. प. शाळा घोयेगाव कोपरगाव

संदीप जनार्दन कोरडे, उपाध्यापक जि. प. शाळा गोर्डेवस्ती राहाता

स्वाती तान्हाजी पटारे उपाध्यापिका जि. प. शाळा अशोकनगर श्रीरामपूर

 

सुवर्णा मोहन कचरे, उपाध्यापिका जि.प. शाळा कुक्कडवेढे राहुरी

राहुल अशोक आठरे,पदवीधर जि. प. शाळा भालगाव नेवासा

सुरेखा काशिनाथ खाडे, उपाध्यापिका जि.प. शाळा राजणी पाथर्डी

अमोल पंढरीनाथ पवार पदवीधर,जि.प. शाळा बावी जामखेड.

अमोल भिमराव हुमे उपाध्यापक जि.प. शाळा अंबिकानगर, कर्जत

शहाजी दत्तात्रय खराडे उपाध्यापक जि.प. शाळा भानगाव, श्रीगोंदा

प्रविणकुमार रंभाजी झावरे उपाध्यापक जि. प. शाळा टाकळी ढोकेश्वर, पारनेर

मनोज मच्छिंद्र काशीद उपाध्यापक जि.प. शाळा खोसपुरी, अहिल्यानगर.

किशोर एकनाथ मिसाळ उपाध्यापक जि. प. शाळा झिरपेवस्ती शेवगाव आदी शिक्षकांचा समावेश आहे.

उत्कृष्ट केंद्रप्रमुख पुरस्कार

केंद्रप्रमुख पुरस्कार हा जिल्हा परिषद स्तरावरील असून यामध्ये उत्तर व दक्षिण विभागातून खालील दोन केंद्रप्रमुखांचा गौरव करण्यात येणार आहे. यात बाळासाहेब रामभाऊ जाधव धांदरफळ बु. संगमनेर आणि रामराव माणिकराव निकम पाटोदा, जामखेड यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here