Home क्राईम शनिशिंगणापूर माझे माहेर

शनिशिंगणापूर माझे माहेर

2
0

शनिशिंगणापूर – प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे येऊन शनिदेवाचे दर्शन घेतले. यावेळी उदासी महाराज मठात पुरोहितांच्या हस्ते त्यांनी शनिदेवाचा तैलाभिषेक केला. त्यानंतर शनी चौथऱ्याखालून देवाचे औक्षण करून शनिदेवाला राखी तसेच पाच ग्रॅम सोन्याची साखळी अर्पण केली. त्यांच्यासमवेत ॲड.आश्लेषा गोवारीकर उपस्थित होत्या.

सन १९९२ मध्ये अनुराधा पौडवाल यांनी शनिदेवाची भजने असलेली मराठी ध्वनिफीत प्रकाशित केली होती. त्यानंतर १९९५ मध्ये शनिदेवाच्या लीलांवर आधारित ‘सूर्यपुत्र शनिदेव’ हा चित्रपट त्यांनी निर्माण केला. या माध्यमातून शनिशिंगणापूर तीर्थक्षेत्राची प्रसिद्धी वाढण्यास हातभार लागला आणि भाविकांचा ओघ वाढला.

अनुराधा पौडवाल म्हणाल्या, शनिदेव हे विश्वाचे न्यायदेवता असून चांगले कर्म करणाऱ्यांना चांगले फळ, तर वाईट कर्म करणाऱ्यांना शिक्षा देतात. माझी मनोकामना पूर्ण झाल्याने मी दरवर्षी शनिदेवाला आणि
स्व. बाबुराव बानकर भाऊंना राखी बांधण्यासाठी येथे येते. स्व. बानकर भाऊ माझ्यासाठी आदर्श व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या सहकार्याचा मला जीवनात मोलाचा लाभ झाला.

शनिशिंगणापूर हे माझे माहेर
शनिशिंगणापूर हे माझे माहेर असून शनिदेवाने आणि स्व. बाबुराव बानकर यांनी मला लेक मानली आहे. त्यामुळे दरवर्षी रक्षाबंधनानिमित्त माहेरची साडी मला येथेभेट दिली जाते. – अनुराधा पौडवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here