राहुरी : तालुक्यातील मांजरीतील मळहद वस्ती परिसरात उसाच्या शेतात पाणी लावण्यासाठी गेलेल्या बाप लेकावर बिबट्याचा हल्ला झाल्याची घटना आज गुरुवार 27 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजेच्या दरम्यान घडली.

भीमराज सखाराम विटनोर (वय 48) व त्यांचा मुलगा दिगंबर (वय 17) हे सोबत असताना बिबट्याने भीमराज सखाराम विटनोर यांच्यावर हल्ला केला.

आपल्या वडिलांना बिबट्याच्या तावडीतून वाचविण्यासाठी मुलगा दिगंबर यांनी बिबट्यावर मातीचे ढेकूळ दगड फेकले.दरम्यान बिबट्याने भिमराज यांना सोडून दिगंबर यांच्याकडे धाव घेतली.आपल्या मुलाला वाचविण्यासाठी भीमराज यांनी मोठ मोठ्याने आरडा ओरडा केला..शेवटी आवाज ऐकून परिसरातील रहिवाशी लक्ष्मण विटनोर यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली…अन् बाप लोकांना बिबट्याच्या तावडीतून सोडले…जखमी बाप लेकास मांजरीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.तेथून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सुरुवातीपासून घटनास्थळ असलेले लक्ष्मण विटनोर यांनी दिली..
वन विभागाची टीम घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी दाखल झाली असून पुढील कार्यवाही सुरू आहे. परिसरातील रहिवासी शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.. सकाळच्या हल्ल्यामुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. घटनास्थळी
वन परिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर साळुंके, वनपाल महेश ससे,वनरक्षक रामचंद्र आडगळे,बाळासाहेब आटूळे,निलेश जाधव,मेजर गवळी,वाहन चालक ताराचंद गायकवाड यांनी पाहणी करून पिंजरा लावण्याची कार्यवाही सुरू आहे.. बिबट्यासोबत त्याची पिल्ले असल्याची माहिती वनरक्षक आडगळे यांनी दिली...
मुख्य संपादक गणेश हापसे
सेलिब्रिटी अँकर 9730377511












