ब्राम्हणी : शिव मल्हार मेन्स वेअर कपड्यांच्या भव्य दालनाचे उद्घाटन गुरुवार 27 ऑगस्ट रोजी ब्राम्हणी बस स्टॅन्ड येथे मुक्ताई कॉम्प्लेक्समध्ये सायंकाळी 6 वाजता होत असल्याची माहिती शिव मल्हारचे संचालक गणेश पांडुरंग वाकडे यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना दिली.
याप्रसंगी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजुभाऊ शेटे, राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष अजित दादा पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकारणी सदस्य नानासाहेब जुंधारे, यशवंत सेनेचे विशाल नगरे आदींसह मान्यवर उपस्थित आहेत…
फॅशनप्रेमी तरुणाईसाठी नवीन शिव मल्हार दालन आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.या नूतन दालनामध्ये तरुणाईसाठी आणि सर्व वयोगटातील पुरुषांसाठी ट्रेंडी शर्ट्स, जीन्स, ट्रॅव्हल वेअर, फॉर्मल्स, तसेच सणासुदीसाठी खास एथनिक वेअर आणि फॅन्सी व्हरायटी उपलब्ध राहणार आहे.
नगर,पुणे आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये मिळणारे नामांकित ब्रँड्स आणि दर्जेदार कपडे आता एकाच छताखाली उपलब्ध असणार आहेत.
उद्घाटनाच्या प्रसंगी परिसरातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, व्यावसायिक आणि ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गणेश वाकडे यांनी केले आहे..












