Home महाराष्ट्र ब्राह्मणीच्या सभासदांना साखर वाटप

ब्राह्मणीच्या सभासदांना साखर वाटप

2
0

राहुरी : तालुक्यातील ब्राम्हणी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीकडून दिवाळीनिमित्त 1 हजार 900 सभासद शेतकऱ्यांना प्रति 5 किलो प्रमाणे 95 क्विंटल साखर वाटप करण्यात येत आहे.

गुरुवार 5 नोव्हेंबरपासून साखर वाटप शुभारंभ करण्यात आला.यावेळी संस्थेचे मार्गदर्शक बाळकृष्ण बानकर, चेअरमन भागवत देशमुख, व्हॉइस चेअरमन अशोक नगरे, संचालक शिवाजी राजदेव, महेंद्र तांबे, अनिल ठुबे,ठकसेन बानकर,नंदकुमार बल्लाळ, संस्थेचे सचिव अशोक आजबे आदींस सभासद शेतकरी उपस्थित होते..

सर्व सभासद शेतकऱ्यांना साखर वाटप वितरण करण्यासाठी संस्थेचे कर्मचारी बापूसाहेब ढेपे,पांडुरंग हापसे,सागर घोडके व्यंकटेश हापसे,अशोक देशमुख, गोवर्धन बानकर आदी प्रयत्नशील आहेत…

पुढील दोन-तीन दिवस साखर वाटप सुरू राहणार आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here