
ब्राह्मणी : गावातील वन विभागाच्या फॉरेस्टमध्ये अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री 10-12 नवजात जिवंत वासरे (गोऱ्हे) आणून सोडल्याचा संताजनक प्रकार घडला आहे.
फॉरेस्ट परिसरातील मोकाट कुत्र्यांनी सदर वासरांना जखमी केले. यामध्ये काही मेले आहे.तर,काही जखमी आहेत.काही अद्याप जीवंत आहे. सदर प्रकार सकाळी परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांच्या लक्षात आला. परिसरातील गोरक्षक व शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जिवंत असणाऱ्या वासरांना कुत्र्यांपासून,कावळ्यापासून वाचविण्याचा प्रयत्न केला. उपस्थितांनी याप्रकरणी संताप व्यक्त करत सदर प्रकरणी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली. सदर घटना समजतात सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी,ग्रामस्थ जमा झाली.सदर प्रकरणी पुढील कार्यकवाही सुरू आहे.















