ब्राम्हणी : रविवारी पहाटे 3 च्या सुमारास ब्राह्मणी परिसरातील घेरुमाळ (हापसे वस्ती), तरोळी ( ठूबे वस्ती परिसर) व अन्य भागात काही पाऊस झाला.
कपाशी सोयाबीनला चांगलाच दिलासा मिळाला.
सकाळी उठल्यानंतर परिसरातील शेतकरी गावात आले. तर गावात पाऊस पडला नसल्याचा दिसून आलं. गावात पाऊस पडल्याची चर्चा झाली. अनेकांनी आचार्य व्यक्त केले. काहीना भरोसा पटेना. तुम्हाला पाऊस पडलाय आम्हाला कसा पडला नाही. तुमचं भारी काम झालं. पिकांना पाणी द्यायचा ताण वाचला. अशी चर्चा चहाच्या हॉटेलमध्ये रंगली. तुम्ही तर चांगलेच नशीबवान आम्हीच काय केलं? आता इथून पुढे आम्हालाही पाऊस पाठवत जा. इतर शेतकऱ्यांनी घेरुमाळ वस्तीवरील शेतकऱ्यांना केली.अन् एकच हशा पिकला…..
पाऊस आमच्या हातात असता तर आम्ही सर्वांना पाठवला असता…….