गणराज्य न्यूज ब्राम्हणी – मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यासाठी ब्राह्मणीतील उपकेंद्रात रविवार २५ रोजी कॅम्प घेण्यात आला.
दिवसभरात एकूण २९५ लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले. सदर ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांना चष्मा,व्हीलचेअर,फोल्डिंग वॉकर श्रवण यंत्र, स्टिक व्हीलचेअर,लंबर बेल्ट आदीसह विविध आवश्यक साहित्य मिळणार आहे.
सरपंच सुवर्णाताई बानकर उपसरपंच गणेश तारडे, सदस्य शांताराम हापसे यांच्या हस्ते कॅम्पचे उद्घाटन झाल. समुदाय आरोग्य अधिकारी आकाश घाटोळे,आरोग्य सेवक, प्रल्हाद खेडकर,आरोग्य सेविका उषा उरुडे,सर्व ग्रा.पं कर्मचारी,सर्व आशा सेविका आदींनी लाभार्थ्यांची अर्ज भरून कॅम्प यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.