सोनई – ब्राम्हणी – : वंजारवाडीमधील यशवंत पाणी वापर संस्थेच्या तज्ञ संचालकपदी गणराज्य न्यूजचे संपादक प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे यांची निवड करण्यात आली.
यशवंत पाणी वापर संस्थेच्या 3 मार्च रोजीच्या निवडणूकीत यशवंत शेतकरी पॅनलच्या विजयी नूतन संचालक यांच्यासह नवनियुक्त तज्ञ संचालकांचा कल्याणम लॉन्स येथे सोमवार 11 मार्च रोजी सायंकाळी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कल्याणमचे संचालक ईश्वर दराडे यांनी सर्वाचे स्वागत केले.तर,पत्रकार गणेश हापसे यांनी प्रास्ताविक केले. यशवंत शेतकरी मंडळाचे प्रमुख, माजी चेअरमन महादेव दराडे यांची मानद सचिवपदी निवड जाहीर करण्यात आली.
याप्रसंगी नूतन संचालक किरण दराडे,गणेश दराडे,अशोक दराडे,दिनकर बानकर,गोरख वने,सखाराम शिंदे, बाळासाहेब जामदार, सुदाम बानकर,सचिव संभाजी दराडे, तज्ञ संचालक गणेश हापसे यांच्यासह सुरेशराव शिंदे, महादेव रामकिसन दराडे, पारूबाई सांगळे, हनुमंत शिंदे, बाळासाहेब दराडे, ज्ञानदेव दराडे, श्रीपती दराडे, हरिभाऊ गडाख, अशोक कुरकुटे, रामदास कदम, श्रीधर दरंदले,रशीद इनामदार,बाबासाहेब दराडे आदी तज्ञ संचालकांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विठोबा आव्हाड, कैलास आव्हाड नवनाथ दराडे बाळासाहेब शिंदे भाऊसाहेब दराडे, विजय बानकर टेलर, देविदास दराडे, देविदास डोळे, विठ्ठल पटारे,मच्छिंद्र वने, रामेश्वर दराडे, काकासाहेब ढगे, शुभम डोळे, गोरख दराडे, महेश डोळे, कैलास आव्हाड, डॉ. कुरकुटे, सागर कुरकुटे, एकनाथ दराडे, केशव दराडे, चिंतामणी दराडे आदीसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. तज्ञ संचालक पत्रकार गणेश हापसे, मानद सचिव महादेव दराडे, संचालक अशोक दराडे यांनी मनोगत व्यक्त केले. तर आभार तज्ञ संचालक ज्ञानदेव दराडे यांनी मानले.
तज्ञ संचालक म्हणून संस्थेने जो विश्वास टाकला.तो सार्थकी ठरवण्याचा आमचा प्रयत्न असेल. संस्थेच्या प्रगतीसाठी कायम प्रयत्नशील राहू.अशी ग्वाही तज्ञ संचालक गणेश हापसे यांनी सत्कारला उत्तर देताना दिली.