राहुरी – पोलिसांनी 11 मोटरसायकल राहुरी पोलिसांकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत.
चोरीच्या गाड्यांवर खोटी नंबर प्लेट बसून देणाऱ्या रेडियम दुकानदारालाही केली अटक करण्यात आली असून आता पर्यंत एकूण चार जण ताब्यात घेण्यात आले आहेत.
गत दिवसापासून राहुरी शहर व इतर ठिकाणाहून मोटरसायकलीचे प्रमाण वाढले होते. Db पथक मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीचा शोध घेत होते. त्यावेळी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमिदारा मार्फत दोन संशयतांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु खात्रीशीर खबर असल्याने 1)नावेद इब्राहिम शेख वय 23 रा जातप ता राहुरी,2)मंगेश विष्णू ठाकर वय 22 रा-सोमय्या फार्म ता- राहुरी या दोघांना दिनांक 14/07/2024 रोजी अटक केल्यानंतर त्यांनी चोरलेली गाडी ही आरोपी 3)किशोर अंकुश पवार व 19 रा.उंदीर गाव ता- श्रीरामपूर त्याच्याकडे दिलेली असल्याचे सांगितल्याने त्यालाही दिनांक 15/07/2024 रोजी अटक केली. तपासादरम्यान एकूण दोन मोटसायकल जप्त करण्यात आल्या होत्या.तसेच यातील आरोपी नावेद इब्राहिम शेख वय 23 रा जातप ता राहुरी याने देवळाली प्रवरा व टाकळीमिया या ठिकाणावरून अजून दोन मोटरसायकल चोरल्याची कबुली दिल्याने त्याला मान्य न्यायालयाकडून राहुरी पोलीस स्टेशन गुरं न 603/24 मध्ये वर्ग करून तपास करत असताना आरोपीने सदर गुन्ह्यात चोरलेली मोटरसायकलवर कलर्स रेडियम राहुरी फॅक्टरी येथे जावेद रज्जाक शेख याचे कडून सदर चोरीच्या मोटरसायकल वर बनावट नंबर प्लेट लावून विल्हेवाट लावल्याची कबुली दिल्याने व नंबर प्लेट लावताना सदर गाडी चोरीची असून तीचे कागदपत्राची कुठलीही खातरजमा न करता नंबर प्लेट लावल्याने आरोपी जावेद रज्जाक शेख यास दिनांक 19/07/2024रोजी अटक करून 1)नावेद इब्राहिम शेख वय 23 रा जातप ता राहुरी 2)जावेद रज्जाक शेख राहणार संक्रापूर तालुका राहुरी या दोघांनाही मान्य न्यायालयापुढे दिनांक २०/७/२०२४ रोजी हजर ठेवून पोलीस कस्टडीची मागणी केली असता सरकारी अभियोक्ता श्री गागरे यांनी सरकारी पक्षाचीवबाजू मांडून 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली. पोलीस कस्टडी दरम्यान आरोपी नावेद इब्राहिम शेख वय 23 रा जातप ता राहुरी याने अजून नऊ चोरलेल्या मोटरसायकल तपासा दरम्यान काढून दिल्या.
अशा प्रकारे राहुरी पोलिसांनी एकूण 11 मोटरसायकल जप्त करून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील व श्रीरामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण 11 गुन्हे उघडकिस आणलेत.
सदर कारवाई मा.राकेश ओला पोलिस अधीक्षक सो,अहमदनगर, मा.वैभव कुलुबर्मे अपर पोलिस अधीक्षक अहमदनगर, मा. बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन, सहायक पुलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे, रवींद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, धर्मराज पाटील, सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते,पोहेकॉ/ सुरज गायकवाड, संदिप ठाणगे, राहुल यादव, पोना/ प्रविण बागुल, पोकों/प्रमोद ढाकणे, नदीम शेख,सचिन ताजणे,पोको गोवर्धन कदम,जयदीप बडे, अजिनाथ पाखरे,सतीश कुऱ्हाडे,अंकुश भोसले, आजिनाथ पाखरे मोबाईल सेल श्रीरामपुर चे पोना/सचिन धनाड, पोना/संतोष दरेकर यांनी केली आहे पुढील तपास सहाय्यक फौजदार आहेर हे करत आहेत.
राहुरी पोलिसांच्या वतीने नंबर प्लेट बनवणाऱ्या व्यावसायिकांना आव्हान करण्यात येते की आपल्याकडे कोणताही ग्राहक वाहनावर नंबर प्लेट बसविण्यास आला असता सदर वाहनाचे आरसी बुक, चेसीस नंबर, इंजिन नंबर याची तपासणी करून खात्री करून नंबर प्लेट बसवाव्या. चोरीच्या मोटरसायकलवर कुणी बनावट नंबर प्लेट बसवताय असा संशय आल्यास तात्काळ राहुरी पोलिसांशी संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे.