Home Blog ब्राह्मणीत अपघातांची मालिका

ब्राह्मणीत अपघातांची मालिका

10
0

राहुरी : तालुक्यातील ब्राम्हणी बस स्टॅन्ड परिसरात राहुरी शनिशिंगणापूर रस्त्यावर अपघाताची मालिका सुरू आहे.
ब्राह्मणी बस स्टँडवर कायम रहदारी असते.वास्तविक येथे गतिरोधक असणे गरजेचे असताना मात्र बस स्टॅन्डवर गतिरोधक नाही. रस्त्यावरून वाहने जोरात चालतात परिणामी अपघात होत आहे. उंबरे,पिंपरी अवघड, गोटुंबे आखाडा या गावात बस स्टॅन्डवर गतिरोधक दिसून येतात. मग ब्राम्हणी गावात का नाही.असा प्रश्न उपस्थित होत आहे.एवढे बळी गेले असताना बांधकाम विभाग नेमकी आणखी किती अपघाताची वाट पाहणार असा प्रश्न निर्माण होत आहे. तात्काळ गतिरोधक न बसवल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

गुरुवार 18 रोजी सकाळी 9 वाजता दुचाकी व चारचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये तीन तरुण गंभीर जखमी झाले. तर त्याच दिवशी रात्री 10 वाजता दुचाकीवरील एका ऊस तोडणी कामगाराचा व अज्ञात वाहनाचा अपघात झाला.दरम्यान अंदाजे तीस वर्षीय तरुण जागीच ठार झाला. यापूर्वी ब्राम्हणी बस स्थानकावर अनेक अपघात झाले. बांधकाम विभागाने त्वरित दखल घ्यावी असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here