ब्राम्हणी : पंढरीची वारी महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा जोपासण्यासाठी पंढरी प्रतिष्ठान संचलित स्व.विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूलच्या हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली वारी पंढरीची ज्ञानगंगा बानकर स्कूलची या सोहळ्याचे शनिवार 5 जुलै रोजी सकाळी 9 वाजता ब्राम्हणी गावात आयोजन करण्यात येत आहे.
सोहळ्यात विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणीसह विविध संत,वारकरी,टाळकरी,भाविक या भूमिकेत दिसणार आहेत. याप्रसंगी भव्य रिंगण सोहळा पार पडणार आहे. या माध्यमातून ब्राह्मणीस प्रति पंढरपूर नगरीच् स्वरूप येणार आहे.हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी सर्व पालक,ग्रामस्थ,शिक्षण प्रेमी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्कूलच्या प्राचार्य अश्विनी बानकर यांनी केले आहे.
















