ब्राम्हणी ते पंढरपूर आषाढी वारी निमित्त पायी चालत जाणारा आदिशक्ती संत मुक्ताई पालखी सोहळा पंढरपूर नगरीत मुक्ताई मठात शुक्रवार ३ रोजी सायंकाळी दाखल झाला.शनिवार ४ जुलै रोजी सकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात पालखी समवेत वारकऱ्यांचा प्रदक्षिणा सोहळा पार पडला.
शनिवार २१ जून रोजी आदिशक्ती संत मुक्ताई पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान ब्राम्हणी गावातून झाले होते.१५ दिवस हाताने पालखी ओढत पायी चालत वारकरी अखेर शुक्रवारी पंढरी पुण्यनगरीत पोहोचले.













