ब्राम्हणी : संपत (दाजी) नागुजी भवार यांचे आज दुपारी निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज गुरुवार दि.7 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे.
कमी शिक्षण असताना कला कौशल्य व अनुभवच्या जोरावर संघर्षातून पुढे येत एक यशस्वी कुटुंब प्रमुख ओळखले जाणारे व्यक्तिमत्व संपत दाजी भवार यांनी ब्राम्हणीत सायकल दुकान चालविले. जुन्या पिढीतील एक उत्कृष्ट व आदर्श वाहन चालक म्हणून संपत दाजी भवार यांची ओळख कायम आहे. अनेक वर्ष त्यांनी टेम्पो चालविला. गावात त्याकाळी कोणत्याही परिवाराचे लग्नकार्य असो संपत दाजी यांचा वऱ्हाडी मंडळीच्या प्रवासासाठी टेम्पो निश्चित होता… देवदर्शन, यात्रा आधी संविधान कार्यक्रमासाठी उत्सवासाठी दाजींचा टेम्पो प्रवासादरम्यान पाहायला मिळायचा. उभ्या आयुष्यात रस्त्यावर वाहनचालक म्हणून चालताना विना अपघात म्हणून त्यांची सेवा राहिलीआहे.
संपत दाजी भवार एक महिन्यापासून आजारी होते. भवार परिवाराने त्यांची उपचाराची पूर्ण काळजी घेतली.
गत आठवड्यात नगर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आली होते. त्यांच्या निवासस्थानी त्यांची अखेर प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुले,सूना नातवंडे असा परिवार आहे. पैलवान सखाकारी भवार यांचे ते बंधू तर,ग्रामपंचायतचे माजी सदस्य बाबासाहेब भवार, सैन्यदिलातील सेवानिवृत्त मेजर बहिरनाथ यांचे वडील होते.यमाजी दाजी पटारे याचे ते मावस भाऊ होते. तर, माजी उपसरपंच कैलास पटारे , संजय पटारे, बापू पटारे,रामभाऊ पटारे यांचे ते काका होते.