नेवासा – तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील लटकुंचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांनी गाव बंदची हाक दिली आहे.
दि.२३ रोजी शनिशिंगणापूर येथील पथकर नाक्यावर लटकु,ग्रामपंचायत कर्मचारी व भावीक यांच्यात वाद झाला. आपल्या गाळ्यावर येणारे वाहन आहे. त्याकडून पथकर पावती घेऊ नकोस असे म्हणत असताना दारुच्या नशेत असणाऱ्या लटकुने पथकर नाक्यावरील सोमनाथ बानकर नामक कर्मचाऱ्यावर हल्ला करत जखमी केले. तशी रितसर फिर्याद देखील शिंगणापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. लटकुमुळे आता भाविकांबरोबर स्थानिकांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. जोपर्यंत लटकुंचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत गाव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी काल तातडीने ग्रामसभा घेत घेतला आहे. तशा आशयाचे निवेदन मा. गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. जिल्हाधिकारी साहेब, अहमदनगर ,उपविभागिय पोलिस अधिक्षक साहेब, शेवगाव ,मा. तहसिलदार साहेब, नेवासा ,मा. सहा. पोलिस निरीक्षक साहेब, पोलिस स्टेशन, शनिशिंगणापूर.यांना आपल्या सह्या असलेले निवेदन ग्रामस्थांनी दिले.