ब्राम्हणी : गावातील खळवाडीतील पाण्याच्या टाकीलगत नवीन गोशाळेच्या प्रत्यक्ष बांधकामाचा भूमिपूजन आज बुधवार 6 मार्च रोजी सकाळी नारळ फोडून पार पडले.
कत्तलीसाठी कत्तलखान्यात जाणारी आपली माता गोमाता वाचविण्यासाठी गावातील गोरक्षक तरुणांनी लोकसहभागातून त्या गाईंसाठी गोशाळा उभारणीसाठी सुरुवात केली.त्यासाठी गाईंना निवारा,पिण्याच्या पाण्याची,चाऱ्याची सुविधा,दावणीची गरज आहे.त्यासाठी इच्छुक दानशूर यांनी आर्थिक व वस्तू रूपाने सहकार्य करावे..असे आवाहन गोमाता रक्षक तरुणांकडून करण्यात येत आहे.
ब्राम्हणी परिसरात पहिलीच गोशाळा उभारली जात आहे.त्यासाठी आपले सर्वाचे सहकार्य अपेक्षित आहे.नवनाथ दंडवते -7028548485 व 7798798485,मच्छिंद्र ढोकणे -9975559788,मच्छिंद्र भिसे-9970080601 यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात येत आहे.
भूमिपूजन शुभारंभसाठी राम राजदेव, महावीर चेगडिया,एकनाथ हापसे, संदीप हापसे,सोमनाथ हारेल,विकास ठूबे,पोपट चव्हाण,आबा मोकाटे, संभाजी ठूबे,राहुल मोकाटे,निवेदक,पत्रकार गणेश हापसे आदी उपस्थित होते……