वांबोरीतील महेश मुनोत विद्यालयाच्या सन 2004 – 2005 मधील इयत्ता दहावी वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला..
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य बाबुराव ठोकळ हे होते. प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य रविकिरण पटारे यांनी केले.दरम्यान प्रत्येकाने मनोगत व्यक्त करताना शाळेतील आठवणी,अविस्मरणी गोष्टी,घटनांचा उल्लेख केला. शिक्षकांची मिमिक्री करत उपस्थितांना हसविले. शिक्षकांची भाषणे झाली.विविध क्षेत्रात आपले विद्यार्थी काम करत असल्याचे समाधान असे मत व्यक्त करत शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने अनेक गोष्टी शिकविल्या.
यावेळी आसाराम रहाणे,शंकर शेवाळे,साहेबराव ठाणगे,लक्ष्मीकांत जोशी, कान्हुजी जाधव, अजीत मुनोत,महादेव गोसावी,नारायण नवले,पुष्पलता पटारे, शोभा सारवंत आदी सेवानिवृत्त माजी शिक्षक उपस्थित होते.सर्व शिक्षकांचा गिफ्ट देवून सन्मान करण्यात आला. विविध खेळ घेण्यात आले.यामध्ये विजेत्यांना बक्षीस देवून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी रक्कम जमा करुन दहावीच्या प्रत्येक वर्गात शिकविताना व भाषण करण्यासाठी आवश्यक असे पाच डेक्स देण्याचे जाहीर केले.यावेळी रूपाली वेताळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला.उपस्थित सर्वाचे आभार सचिन पटारे यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत विविध खेळाचे गणेश हापसे यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. स्नेहभोजन कार्यक्रम पार पडल्यानंतर पुन्हा वर्गात जावून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवीत जुन्या आठवणींना उजळा दिला.













