सोनई – संत वामन भाऊ व संत भगवान बाबा प्रतिष्ठान वंजारवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा यंदाचा समाजभूषण पुरस्कार विठ्ठल – रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांना आज सोमवार 20 जानेवारी रोजी सायं 7 वाजता दिला जाणार आहे.
आज वंजारवाडी येथे भागवताचार्य हभप अतुल महाराज आदमने यांच्या समुद्र वाणीतून सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथेचा समारोप सोहळा होत असून या कार्यक्रमात समाजभूषण पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.दरम्यान कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून सोनई वंजारवाडी परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संत वामन भाऊ व संत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.
















