ब्राह्मणी : सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी काशिनाथ राजदेव यांची तर,व्हाईस चेअरमनपदी सौ.अनिता ठकशेन बानकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
चेअरमन पदाची सूचना श्री.महेंद्र नारायण तांबे व अनुमोदन श्री भागवत रंगनाथ देशमुख यांनी दिले तर,व्हाईस चेअरमन पदाची सूचना अनिल दत्तात्रय ठुबे व अनुमोदन सौ सुमन जालिंदर हापसे यांनी दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुरीचे सहाय्यक निबंधक दीपक पराये यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली. त्यांना संस्थेचे सचिव अशोक अजबे यांनी सहकार्य केले.यावेळी संचालक मंडळाच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच सौ.सुवर्णा बानकर, माजी संरपच प्रकाश बानकर,सोसायटीचे माजी चेअरमन व संचालक सुरेश बानकर, भागवत देशमुख,श्रीकृष्ण तेलोरे,अरुण बानकर आदीसह सभासद,ग्रामस्थ उपस्थित होते.















