मंगल अक्षदा कलश ब्राह्मणीत
श्रीराम भक्तांकडून उत्साहात स्वागत
ब्राम्हणी : आयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या बालस्वरूपातील नवीन मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच निमंत्रण म्हणून प्रत्येक गावोगावी येणाऱ्या पवित्र मंगल अक्षदा कलशाच ब्राम्हणीत शनिवारी दुपारी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
ब्राह्मणी गावातील सर्व भक्तांनी मंगल अक्षदा कलशाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. बस स्टॅन्ड ते श्रीराम मंदिरापर्यंत वाजत गाजत कलशाची मिरवणूक काढली. जय श्री रामाचा जयघोष करत फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली. मंदिर परिसरात महिलांनी कलशाला कुंकूम तिलक लावून ओवाळले.दरम्यान मंत्र उपचारात विधिवत पूजा करत कलश श्रीराम मंदिरात ठेवण्यात आला. पुढील नियोजनाप्रमाणे अक्षदा कलश प्रत्येक वाड्यावस्तीवरील मंदिरापर्यंत मंगल कलश घेऊन जात अयोध्यातील मूर्ती प्राणप्रतिष्ठाचे निमंत्रण अक्षदा कलाशाच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचण्याचा श्रीराम भक्तांचा निर्धार आहे.