Home Blog ब्राम्हणी शिवालयास अमरनाथ

ब्राम्हणी शिवालयास अमरनाथ

2
0
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:8; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.1000,0.0000; motionR: 0; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (0, 0);aec_lux: 268.2824;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 30;

राहुरी (गणराज्य न्यूज ) : चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त 7 सप्टेंबर रोजी ब्राम्हणी येथे अमरनाथ शिवलिंगाची प्रतिकृती साकारण्यात आली. यामध्ये बर्फापासून साकारण्यात आलेल्या आकर्षक शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील शिवभक्तांनी रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी केली.

‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता. बर्फाचे शिवलिंग आणि आकर्षक फुलांची सजावट,विद्युत रोषणाईमुळे भाविकांना जणू अमरनाथमध्येच भगवान भोलेनाथाचे दर्शन घेत असल्याचा अनुभव मिळाला.

शिवभक्तांसाठी अमरनाथ यात्रा हे श्रद्धेचे मोठे स्थान आहे. प्रत्यक्ष अमरनाथला जाता न आल्याने ब्राम्हणीतच अमरनाथची प्रतिकृती व बर्फाचे शिवलिंग साकारल्याने परिसरातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.श्रावणातील शेवटच्या सोमवारच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात आलेल्या या धार्मिक उपक्रमामुळे ब्राम्हणी परिसराला अमरनाथचे स्वरूप प्राप्त झाले होते.

शिवभक्त सुरेश हापसे,ऋषिकेश गाढे, सारंगधर देशमुख यांच्या संकल्पनेतून व सहकारी शिवभक्तांच्या सहकार्यातून अमरनाथ शिवलिंगाची प्रतिकृती साकारण्यात आली. सोमवारी मध्यरात्रीपर्यंत फोटो काढण्यासाठी शिवभक्तांनी गर्दी केली.तर,सोशल मीडियावर अनेकांना अप्रत्यक्ष दर्शन घडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here