Home महाराष्ट्र वांबोरीतील बाजार पेठेला नवी प्रेरणा

वांबोरीतील बाजार पेठेला नवी प्रेरणा

53
0

वांबोरी

गत 32 वर्षापासून आर्थिक क्षेत्रात विश्वास संपादन करणाऱ्या प्रेरणा पतसंस्थेच्या वांबोरीतील नूतन शाखेचा उद्घाटन सोहळा सोमवार 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी कारखान्याचे चेअरमन अरुण साहेब तनपुरे यांच्या हस्ते होत आहे.तरी वांबोरी परिसरातील व्यापरी ,शेतकरी, छोटे व्यावसायिक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक चेअरमन सुरेश गोरक्षनाथ वाबळे यांनी केले.
प्रेरणा पसंस्थेच्या एकूण 6 शाखा असून संस्थेच्या 125 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. 32 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या पतसंस्थेचे वीस वर्षांपूर्वी संगणकीकरण झालेले आहे .कोअर बँकिंग ते सर्व बँकिंग सुविधा वांबोरीत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत .संस्थेचे मोबाईल ॲप आहे. या सर्व बँकींग सुविधा वांबोरी सारख्या बाजारपेठेत ग्राहकांना उपलब्ध होत आहेत.ग्राहकांची अनेक वर्षांची अडचण आता दूर होणार असल्याचे सुरेश वाबळे यांनी सांगितले. संस्थेच्या यापूर्वी गुहा ,म्हैसगांव, तांभेरे ,राहुरी ,आंबी व श्रीरामपूर येथे शाखा आहेत.पुढील महिन्यात ब्राह्मणी व देवळालीप्रवरा येथे सुरू होत असल्याची माहिती व्हाइस चेअरमन मच्छिंद्र हुरुळे यांनी दिली.

32 वर्षापासून खातेदार सभासदांचे हित जोपासत अर्थकारणाला चालना दिली आहे. प्रेरणा परिवार प्रत्येक सभासदाच्या सुख दुःखात सहभागी होत आधार देण्याचं काम करत आली आहे.त्यामुळे प्रत्येक सभासद खातेदाराला प्रेरणा आपल्या कुटुंबाप्रमाणे वाटत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या तुलनेत वांबोरी मार्केट जुन्या काळापासून सर्वात मोठे समजले जाते.नवीन व्यवसाय,उद्योग व सर्वसामान्यांना बचत, कर्ज वितरण याशिवाय अन्य आर्थिक बाबीसाठी विश्वसनीय संस्था म्हणून प्रेरणा काम करत असल्याचा सर्वांचा विश्वास आहे. वांबोरी परिसरातील जनतेच्या आग्रहास्तव नव्याने वांबोरी गावात नवीन पतसंस्था सुरू करत आहोत.तरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित रहा.असे आवाहन व्हाइस चेरमन मच्छिंद्र सोपान हुरुळे व जनरल मॅनेजर गोरक्षनाथ मोहन चंद्र व प्रेरणा परिवाराकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here