गणराज्य न्यूज
राहुरी तालुक्यातील वांबोरी- मोकळ ओहळ या दोन गावच्या सरहद्दीवरील पावन गणपती मंदिर जिर्णोद्धार व कलशारोहण सोहळा सोमवार 25 ऑगस्ट रोजी सकाळी होत आहे.
यानिमित्त सकाळी 10 ते 12 यावेळेत श्री क्षेत्र देवगडचे उत्तराधिकारी स्वामी हभप प्रकाशनंदगिरीजी महाराज यांचे किर्तन व त्यानंतर महाप्रसाद होणार आहे.
गणेश उत्सवाच्या पूर्वसंध्येला होत असलेला सोहळा अविस्मरणीय ठरत आहे. आकर्षक व सुंदर मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. दोन दिवसापासून विधिवत पूजा सुरू आहे. गणेश उत्सवापूर्वी मंदिर विकास केल्याने तरुण गणेश भक्तांमध्ये उत्साह दिसून येत आहे.













