
वांबोरी : हजारो मूर्खांकडून चांगले म्हणून घेण्यापेक्षा एका चांगल्या व्यक्तीकडून चांगले म्हणून घेणे कधी पण चांगल..असे प्रतिपादन वारकरी भूषण हभप अनिल महाराज पाटील बार्शीकर यांनी केले.
विषयाचे ज्ञान देतात ते गुरु विषयाचे भान नष्ट करतात ते सद्गुरू असतात.
जगाला सत्य समजणे म्हणजे संसार होय.अशा विविध महत्वाच्या प्रबोधनात्मक बाबी त्यांनी कीर्तनानून त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितल्या.
वांबोरीतील ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेत सुरू असलेल्या पाच दिवसाच्या किर्तन महोत्सवात दुसऱ्या दिवसाची किर्तन सेवा पाटील महाराज यांची झाली.यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.












