Home महाराष्ट्र इमामपूर घाट आता’ज्ञानेश्वरी घाट

इमामपूर घाट आता’ज्ञानेश्वरी घाट

9
0
Dnyaneshwari Ghat

पांढरीपुल (प्रतिनिधी गणराज्य न्यूज) : छत्रपती संभाजीनगर – अहिल्यानगर  महामार्गावरील पांढरीपुल परिसरातील इमामपूर हद्दीतील घाटाचे आता ज्ञानेश्वरी घाट असे नामकरण करण्यात आले आहे.

शनिवार ११ जुलै रोजी सकाळी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या संत,महंतांच्या हस्ते व हजारो वारकरी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत नामकरण सोहळा पार पडला.

यावेळी माजी मंत्री शंकरराव गडाख,संत ज्ञानेश्वर संस्थानचे विश्वस्त वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के,महंत उद्धव महाराज मंडलिक, मुळा एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख, मुळा कारखान्याचे संचालक डॉ. माऊली दरंदले वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गतवर्षापासून वारकऱ्यांची घााटाच्या नामकरणाची मागणी होती.त्यासाठी पाठिंबा म्हणून परिसरातील ग्रामपंचायतींनी ठराव दिले होते.अखेर आज शनिवारी इमामपूर घाटाचे ज्ञानेश्वरी घाट नामकरण करण्यात आले..

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here