राहुरी : तालुका फोटोग्राफर सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी कुलदीप नवले, उपाध्यक्षपदी बाबा जाधव, सचिवपदी गणेश नेहे तर सहसचिव पदी दीपक गुलदगड यांची निवड करण्यात आली.
राहुरी तालुका फोटोग्राफर सामाजिक संस्थेच्या दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अध्यक्ष उपाध्यक्ष ,सचिव, सहसचिव तसेच संचालक मंडळ यांची निवड प्रक्रिया सोहळा पांडुरंग लॉन्स राहुरी येथे आयोजित केला होता
अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये यावर्षी मतदान प्रक्रिया होऊन अध्यक्ष, उपाध्यक्षची निवड करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष कुलदीप नवले , उपाध्यक्ष बाबा जाधव, सचिवपदी गणेश नेहे, तर सहसचिवपदी दीपक गुलदगड यांची निवड दोन वर्षाकरिता करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित संचालक म्हणून सोनगाव सात्रळ गट किरण शिंदे, राहुरी फॅक्टरी गट महेश शिंदे, कोल्हार गट मंगेश गाडेकर, देवळाली गट गणेश कुंजीर, टाकळीमिया गट अमीन शेख, आरडगाव गट उत्तम बनसोडे, केंदळ मानोरी गट संतोष पवार, मांजरी वळण गट संजय आढाव, राहुरी शहर आणि वाघाचा आखाडा गट सचिन गाडे, नितीन सप्रे , बारागाव नांदूर मुळानगर खडांबे गट, अभिमन्यू आघाव, मल्हारवाडी ताहाराबाद म्हैसगाव शेरी चिखलठाण गट संदीप घाडगे, गोटुंबे आखाडा पिंपरी अवघड सडे गट दिलीप शेटे, उंबरे गट संकेत येवले , वांबोरी ब्राह्मणी गट किशोर लहारे यांची सर्वानुमते नवनिर्वाचित संचालकपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ फोटोग्राफर नजीरभाई सय्यद, किरण शिंदे, वैभव धुमाळ यांनी काम पाहिले तर माजी अध्यक्ष मच्छिंद्र विटनोर, उपाध्यक्ष जालिंदर गडदे सचिव गणेशनेहे यांनी मागील वर्षांमध्ये चांगल्या पद्धतीने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून संस्थेचा उत्कर्ष केला विशेष म्हणजे सर्व सभासदांना संस्थेच्या वतीने 7 लाख रुपयांचे इन्शुरन्स कव्हर, फोटोग्राफर बांधवांसाठी विविध हायटेक वर्कशॉप चे आयोजन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, फोटोग्राफर बांधवांसाठी क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन, आजारी फोटोग्राफर बांधवांसाठी मदत निधी संकलन, वृक्षारोपण, राहुरी कृषी विद्यापीठामध्ये मागील वर्षी जागतिक छायाचित्रकार दिनाचे भव्यदिव्य आयोजन, महिला भगिनींसाठी विशेष गिफ्ट वितरण, गणेशउत्सव आयोजन , विविध चर्चासत्रे आयोजित केल्यामुळे आणि संस्थेसाठी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे माजी अध्यक्ष उपाध्यक्ष, यांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला तसेच सचिव गणेश नेहे यांच्या कायमस्वरूपी उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव, सहसचिव, संचालक, आणि सर्व उपस्थित सभासदांचा शाल आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला सर्व फोटोग्राफर बांधवांनी नवीन अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव नवनिर्वाचित संचालक मंडळाला भावी कार्यासाठी भरून भरून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी अध्यक्ष धनंजय गुलदगड, माजी उपाध्यक्ष नवनाथ बेंद्रे, नजीरभाई सय्यद,बाबासाहेब सूर्यवंशी पेंटर, गंगाधर गीते, राजू भोरे, बाबा कळमकर,अक्षय नारद,ज्ञानेश्वर शिरसाट, सोमनाथ शिरसाट, संजय गायकवाड, संदीप वाणी, किशन दिघे, ,भाऊसाहेब विटनोर, श्रीकांत गोलांडे,विलास दौंड, सचिन ताजणे, मिलिंद वर्षिंदकर, प्रभाकर जाधव, ऋषिकेश वाणी,गणेश वराळे,बापू विटनोर, अर्जुन कोऱ्हाळे, सुरज महांडुळे, विक्रांत वरशिंदकर, दीपक घाडगे, सचिन हिरगळ, सुनील सगळे रज्जाक पठाण यांनी विशेष परिश्रम घेतले
अध्यक्षपदाचा आणि उपाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अध्यक्ष कुलदीप नवले यांनी प्रथम फोटोग्राफर बांधवांसाठी एग्रीमेंट फॉर्म, रात्री होणाऱ्या वाढत्या अपघातामुळे हळदी समारंभातील फोटोग्राफी टाइमिंग फक्त रात्री 10 वाजेपर्यंत करण्याचे तसेच फोटोग्राफर बांधवांसाठी नवनवीन तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिलेआणि नवीन फोटोग्राफर बांधवांना संस्थेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव गणेश नेहे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार दीपक गुलदगड यांनी मानले अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये कार्यक्रम यशस्वी झाला.













