गणराज्य न्यूज
ब्राम्हणी:गावच ज्येष्ठ महिला व्यक्तिमत्व गं.भा.आसराबाई लक्ष्मण तेलोरे (वय ७५ ) यांचे काल बुधवार १३ ऑगस्ट रोजी रात्री ९ च्या दरम्यान निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज गुरुवार दि .१४ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ९ वाजता देवीचे तळे ब्राह्मणी येथे होईल.
त्यांच्या पश्चात तीन मुली,एक मुलगा असा परिवार होता. पालघर जिल्ह्यात सेवेत (ग्रामसेवक) अशोक लक्ष्मण तेलोरे यांच्या मातोश्री व अंगणवाडी सेविका मीनाताई रमेश तेलोरे यांच्या त्या सासू होत्या.तर,ऋषिकेश रमेश तेलोरे (सर) यांच्या त्या आजी होत.
स्पष्ट स्वभावाच्या असणाऱ्या आसराबाई तेलोरे या माळकरी होत्या.आदिशक्ती संत मुक्ताई पायी दिंडी सोहळ्यात कायम पंढरपूरच्या वारीत जात.तेलोरे परिवारातील मातोश्रीस भावपूर्ण श्रद्धांजली!













