Home अहमदनगर पाथर्डीत कॉफी मुक्त अभियानाचा फज्जा

पाथर्डीत कॉफी मुक्त अभियानाचा फज्जा

84
0

गणराज्य न्यूज अहिल्यानगर – बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवताना नायब तहसीलदाराला रंगेहाथ पकडण्यात आल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे.

पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रावर नायब तहसीलदाराला कॉफी पुरवताना रंगेहाथ पकडण्यात आले. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे कॉपी पुरवतानाचा नायब तहसीलदाराचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नायब तहसीलदार अनिल तोडमल यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी देताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. बारावी पेपरमध्ये स्वतःच्याच मुलाला नायब तहसीलदार कॉपी पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रावर ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित नायब तहसीलदारावर नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

परीक्षा केंद्रावरील केंद्रप्रमुख शिक्षक व संबंधित यंत्रणेने त्या नायब तहसीलदाराचा चांगला समाचार घेत प्रकरण उजाडात आणले. याबाबत परीक्षा केंद्रावरील जागृत यंत्रणेच सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here