Home अहमदनगर महाशिवरात्री उत्सव

महाशिवरात्री उत्सव

95
0

गणराज्य न्यूज – राहुरी फॅक्टरी

परमार्थाची आकांक्षा बाळगणाऱ्या सर्वांसाठी महाशिवरात्री ही अत्यंत महत्त्वाची मानले जाते. गेल्या १८ वर्षापासून तन-मन-धन अर्पण करून हा उत्सव ओंकारेश्वर मित्र मोठ्या आनंदाने साजरा करत असल्याचे प्रतिपादन ह.भ. प मनोहर महाराज सिनारे यांनी केले.
ओंकारेश्वर मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी महाशिवरात्री निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या १८ व्या वर्षी यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ह.भ.प मनोहर महाराज सिनारे यांच्या सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले.प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी हजारोंच्या संख्येने परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते.

प्रसंगी माजी आ.चंद्रशेखर कदम,माजी आ. भाऊसाहेब कांबळे,प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे,आदर्श पतसंस्थेचे माजी चेअरमन अण्णासाहेब चोथे, विद्यमान चेअरमन सुधाकर कदम,व्हा. चेअरमन आबासाहेब वाळुंज, राहुरी अर्बनचे चेअरमन रामभाऊ काळे, उद्योजक ऋषभ लोढा, डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी संचालक मच्छिंद्र तांबे, साई सेवा पतसंस्थेचे प्रदीप येवले,शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन,सुखदेव मुसमाडे, भाऊसाहेब गुंजाळ,राष्ट्रवादीचे अजय खिलारी, बाळासाहेब लोखंडे, शशिकांत खाडे,राहुरी अर्बनचे संचालक प्रशांत काळे, माजी नगरसेविका सुजाता कदम,साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर व भाविक भक्तगण उपस्थित होते. हजारो भाविकांना खिचडी प्रसाद देण्यात आला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी ओंकारेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रा.विलासराव मुसमाडे, उपाध्यक्ष भगवान काकड, उपाध्यक्ष किशोर थोरात, कार्याध्यक्ष विष्णुपंत गीते, उपकार्याध्यक्ष डॉ.बबनराव वाकचौरे, सचिव संजय वर्पे, व्यवस्थापक विठ्ठल आढाव, सहसचिव पुनमचंद भंडारी, सल्लागार डॉ.गोपाळकृष्ण रत्नपारखी, संघटक मुकुंद वेदपाठक, सहसंघटक प्रविण पवार, खजिनदार उत्तमराव घोलप, संयोजक संतोष कराळे, सहसंयोजक सुनील गागरे, मार्गदर्शक सुभाषराव घोरपडे, तसेच सदस्य दिलीप गागरे, बाबासाहेब पवार, डॉ.राजेंद्र कवडीवाले, दिलीप भालेकर, बाळासाहेब आढाव, राजू शेख, उमाकांत अनारसे, संदीप जाधव, एकनाथ बनकर, संदीप तावरे, सुरेश भंडारी, संजय चोळके, किसन वरखडे, सुरेश चव्हाण, रवींद्र शिंदे, गणपत शिंदे, दत्तात्रय दरंदले तसेच परिसरातील नागरीक तसेच ओंकारेश्वर महिला बचत गटाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here